Vande Bharat Train New changeESakal
मुंबई
Vande Bharat Train: वंदे भारतमध्ये २७ जुलैपासून होणार बदल, प्रवाशांना होणार फायदा; वाचा सविस्तर
Vande Bharat Update: प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान वंदे भारतमध्ये २७ जुलैपासून नवा बदल होत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे.
मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेसला वलसाड येथे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्वावर देण्यात आला असून २७ जुलैपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.