

Mumbai Local Train CCTV
ESakal
मुंबई : मालाडमधील लोकल हत्याकांडानंतर मुंबईतील उपनगरी लोकल ट्रेनमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजनांना वेग दिला आहे. आतापर्यंत महिलांच्या डब्यांपुरते मर्यादित असलेले सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणेचे जाळे आता फर्स्ट क्लास तसेच सामान्य डब्यांपर्यंत विस्तारले जाणार आहे. या निर्णयामुळे लोकलमधील प्रत्येक प्रवासावर तांत्रिक नजर राहणार असून, ट्रेन क्रूची जबाबदारीही अधिक वाढणार आहे.