

western Railway Kavach System
ESakal
मुंबई : रेल्वे अपघात रोखण्यासाठी तसेच प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेवर ‘कवच’ ही ट्रेन टक्कर प्रतिबंधक आधुनिक सुरक्षा प्रणाली राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या ‘अम्ब्रेला वर्क २०२४-२५’ अंतर्गत ही कामे प्रस्तावित असून, त्यासाठी एकूण ४८३.६५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.