

Mumbai Local Train
ESakal
मुंबईतील पश्चिम रेल्वेने नियमित प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना आज (मंगळवार) मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने कांदिवली कारशेडमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, त्याचबरोबर कांदिवली ते मालाड दरम्यानच्या जलद मार्गावर वेग मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांमुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण १०२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.