esakal | माहीम येथे प्रवाशांसाठी नवीन पादचारी पूल खुला; अपघात टाळण्यासाठी उभारणी
sakal

बोलून बातमी शोधा

mahim bridge

माहीम येथे प्रवाशांसाठी नवीन पादचारी पूल खुला; अपघात टाळण्यासाठी उभारणी

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : पश्चिम रेल्वेद्वारे (Western Railway) वांद्रे दिशेकडील माहीम (mahim) येथे नुकताच नवीन पादचारी पूल (new bridge) प्रवाशांसाठी खुला केला आहे. प्रवाशांना (Commuters) ये-जा करण्यास खूप सोयीस्कर होणार आहे. यासह स्कायवॉकद्वारे (Skywalk) सेनापती बापट मार्गाला आणि धारावीला (dharavi) जोडला गेला आहे. प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडून होणारा अपघात टाळण्यासाठी (railway accidents) पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट यांची उभारणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर माहीम येथे नवीन 4.4 मीटर रुंद आणि 51 मीटर लांब पादचारी पुलांची उभारणी केली.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 379 नव्या रुग्णांची भर; 5 जणांचा मृत्यू

या पुलांच्या उभारणीसाठी 1.65 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. आर्थिक वर्ष 2021-22 मधील पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील दुसरा पादचारी पूल असून पहिला पादचारी पूल वांद्रे आणि खार रोड स्थानकादरम्यान उभारण्यात आला. माहिम येथील जुना पादचारी पूल दुरावस्थेत असल्याने नोव्हेंबर 2019 मध्ये जमीनदोस्त करण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये नवीन पुलाच्या उभारणीची सुरुवात केली. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पादचारी पूल उभारण्यास विलंब झाला. मात्र तरी, पुलाचे कामाला गती देत सप्टेंबर 2021 उभारला, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

loading image
go to top