

Mumbai Local Megablock on Western Railway Line
मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या मुंबई लोकलबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज आणि उद्या हा ब्लॉक घेण्याच येणार असून या काळात अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच काही लोकल या उशिराने धावतील. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.