esakal | रेल्वे कौशल विकास योजनेतून प्रशिक्षण; पश्चिम रेल्वेतर्फे १४८ जणांना प्रशिक्षण | Western railway
sakal

बोलून बातमी शोधा

western railway

रेल्वे कौशल विकास योजनेतून प्रशिक्षण; पश्चिम रेल्वेतर्फे १४८ जणांना प्रशिक्षण

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने (Railway Government) दिलेल्या निर्देशांनुसार पश्चिम रेल्वेने (western railway) ‘रेल्वे कौशल्य विकास योजने’अंतर्गत वेल्डर, मशिनिस्ट, फिटर आणि इलेक्ट्रिशियन या विभागांमध्ये एकूण १४८ उमेदवारांना प्रशिक्षण (candidates training) दिले आहे. या योजनेंतर्गत पुढील तीन वर्षांत ५० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

हेही वाचा: मुंबईत पेट्रोल 110.41 तर डिझेल 101.3 रुपयांवर; इंधनाचे दर स्थिर

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ येथील बेसिक ट्रेनिंग सेंटर, दाहोद येथील बेसिक ट्रेनिंग सेंटर, झोनल इलेक्ट्रिकल ट्रेनिंग सेंटर, बडोदा इंजिनियरिंग वर्कशॉप; तर साबरमती येथे वेल्डर, मशिनिस्ट, फिटर आणि इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणामध्ये मुलांना प्रात्यक्षिकांसह रोजगारासाठीही मदत केली जात आहे, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

loading image
go to top