

Kandivali-Borivali Sixth Line update
ESakal
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या कांदिवली ते बोरिवली स्थानकांदरम्यान उभारण्यात आलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेला हिरवा कंदील मिळाला आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त (पश्चिम मंडळ) यांनी ३.२१ किलोमीटर लांबीच्या या विभागाची सखोल तपासणी करून रेल्वे वाहतुकीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावरून लवकरच रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे.