अजित पवार भाजपसोबत जाण्यामागची ही आहेत का 'तीन' कारणं?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

  • बंड, धमकी की फूस ? 
  • अजितदादांच्या मनात आहे तरी काय? 

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालय. अजितदादांचं हे बंड आहे, की त्यांना कुणाची तरी फूस होती की धमकी असे सवाल या निमित्तानं उपस्थित होतायेत. 

कालपरवापर्यंत विरोधक म्हणून भूमिका बजावणारे अजित पवार अचानक भाजपचे मित्र कसे झाले? हाच सवाल राज्यातल्या जनतेला पडलाय. अजित पवारांच्या या भूमिकेमागे नेमकं कोणतं राजकारण आहे? यावरून राजकीय विश्लेषकही संभ्रमात पडलेत. यामागे तीन अर्थ असू शकतात. 

१. अजित पवारांचं बंड ? 

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. याआधीही त्यांनी बंडाचा सूचक इशारा दिला होता. सत्तास्थापनेसाठी सुरू असलेला घोळ आणि वेळकाढूपणा त्यांच्या पथ्यावर पडला आणि हीच संधी साधून अजित पवारांनी बंड पुकारल्याचं बोललं जातंय.

२. धमकीमुळे अजित पवार भाजपसोबत ? 

अजित पवारांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा आणि सिंचन घोटाळ्याची चौकशी यामुळे अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असू शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे

३. अजित पवारांना फूस? 

अजित पवारांचं बंड हे शरद पवारांचं राजकीय धोरण असू शकतं असाही एक आरोप केला जातोय. पवारांचं राजकारण आजपर्यंत कुणालाच उमगलेलं नाही. सत्तेचा घोळ संपत नसल्यानं पवारांच्या सूचनेवरूनच अजित पवारांनी हा निर्णय घेतला नाही ना? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

अर्थात राजकारणात काहीही होऊ शकतं. सत्तेचं सोपान ही एकमात्र अशी गोष्ट आहे जिच्यासाठी कोण, कधी आणि कुणासोबत जाईल याचा नेम नाही. 

Webtitle : what might be the reasons of ajit pawar going behind BJP


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what might be the reasons of ajit pawar going behind BJP