राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमाबाबत शरद पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत...

राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमाबाबत शरद पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत...

मुंबई : राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले विधान रास्त असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर केलेल्या विधानावरही उत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. त्यासाठी आपल्याला डॉक्टर्सचीच गरज आहे.

शरद पवार म्हणाले होते की, अयोध्येत राम मंदिर उभे राहत आहे, मात्र देशाला कोरोनाची चिंता जास्त आहे. तसेच मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. त्यासाठी डॉक्टर्स लागणार आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवार म्हणत आहेत ते बरोबर आहे. आपल्याला डॉक्टरांची गरज आहे. आपण ज्या सुविधा निर्माण करतोय त्या कोरोना बरा करणार नाहीत. आपल्याला त्यासोबत डॉक्टर हवे आहेत.

मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोले लगावले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आमदार फंड दिल्लीत दिला आहे. ते सर्व गोष्टी दिल्लीतच करत आहेत. त्यांना दिल्लीचीच चिंता आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या दिल्ली भेटीला कोपरखळी लगावली.  ही वेळ राजकारण करण्याची नसून एकदिलाने काम करण्याची असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे :

  • लॉकडाऊनला विरोध करणारे जनतेची जबाबदारी घेणार का?
  • मी फिरत नाही, त्यामुळे घरी अभ्यास होतो , अभ्यास न करता फिरण्याला काय अर्थ आहे
  • सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांत माझा समावेश झाल्याने विरोधकांना पोटदुखी
  • जागतिक आरोग्य संघटनेनने धारावीचे उदाहरण सा-या जगाला दिले, वॉशिंग्टन पोस्टनेही मुंबईत लपवाछपवी नाही असे म्हटले आहे, विरोधक काय म्हणतायत त्याकडे लक्ष देत नाही
  • देवच म्हणतोय मी तुमच्यातच आहे, मंदिरात येऊ नका, गाडगेबाबाही चंद्रभागेतिरी झाडलोट करुन विठ्ठलदर्शन घ्यायचे
  • घाईघाईन लॉकडाऊन लावणे आणि उठवणे चूक, घिसाडघाईनं लॉकडाऊन उठवले आणि साथ पसरली तर जीव जातील
  • "जीव गेला तरी बेहत्तर लॉकडाऊन उठवा" याला आहे का तयारी? मी म्हणजे ट्रम्प नाही, डोळ्यासमोर माझी माणसे तडफडू देणार नाही
  • अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत, राज्यपालांनीही मला कळवलंय, शाळा आत्ताच नाही, अन्यत्र शाळा सुरु होऊन मुलांना बाधा
  • शाळा कधी सुरु होणार पेक्षा शिक्षण कसे सुरु होणार असे विचारा, परीक्षा व्हावी असे मलाही वाटते, पण परिस्थिती तशी नाही
  • मी निर्णय घेताना टीकेची पर्वा करत नाही, बरोबर वाटेल ते करतोच

( संपादन - सुमित बागुल )

what sharad pawar is saying about ram mandir bhoomipujan is right says uddhav thakceray

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com