

Congress Vanchit Bahujan Aghadi alliance
ESakal
बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रमुख राजकीय घडामोडींचे केंद्र बनली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. २०७ जागांवर एकमत झाले आहे. यापैकी भाजप १२८ जागांवर, तर शिवसेना (शिंदे गट) ७९ जागांवर निवडणूक लढवणार आहे. उर्वरित २० जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संयुक्तपणे निर्णय घेतील. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी निश्चित होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विरोधी गोटातूनही एक मोठी घोषणा झाली आहे.