Gunratna Sadavartes colleague arrested in Nagpur
Gunratna Sadavartes colleague arrested in NagpurGunratna Sadavartes colleague arrested in Nagpur

सदावर्तेंच्या सहकाऱ्याला नागपुरात अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Published on

नागपूर : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्याच्यावेळी सदावर्ते यांच्या संपर्कात असलेला नागपुरातील एसटी कर्मचारी संदीप गिरीधर गोडबोले याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतले आहे. संदीप हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या यांत्रिकी विभागातील कर्मचारी आहे. (Gunratna Sadavartes colleague arrested in Nagpur)

शरद पवार यांच्या घरावर चप्पलफेक करण्यासाठी भडकवण्याच्या आरोपात ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अगोदरच अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या संपर्कात असलेला नागपुरातील सहकाऱ्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बुधवारी अटक केली. मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी गणेशपेठ येथे कारवाई करीत संदीपला अटक केली. त्याला पोलिस मुंबईला घेऊन रवाना झाल्याचे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Gunratna Sadavartes colleague arrested in Nagpur
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट; गृहकर्जावरील व्याजदर केला कमी

शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी आंदोलकांनी धुडगूस घालून चप्पलफेक केली होती. यावेळी सकाळी साडेदहा आणि दुपारी दीड वाजता ॲड. सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना नागपुरातून दोन व्हॉट्सॲप कॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या आधारावर नागपूर पोलिसांच्या सहकार्याने मुंबई पोलिसांनी संदीपला अटक (arrested) केली.

चर्चेला लागला पुर्णविराम

ॲड. सदावर्ते यांना नागपुरातून व्हॉट्सॲप कॉल आल्याची माहिती मिळताच नागपुरात चर्चेला उधाण आले होते. यामध्ये कुणी राजकीय व्यक्ती वा पत्रकार तर नाही अशी चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. मात्र, संदीप गोडबोले याला अटक केल्यावर चर्चेला पुर्णविराम लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com