बदलापुरात १९ वर्षाच्या मुलाने २४ तासात २५ चितांना दिला अग्नि

आता स्मशानभूमीबाहेर रांग लागलेली असते
cremation
cremation

ठाणे: मागच्या काही दिवसात आपण जळणाऱ्या चितांची (cremation)हवाई दृश्य पाहिली. दिल्ली, बंगळुरु, गुजरात आणि देशाच्या अन्य शहरात सध्या अशीच स्थिती आहे. मनाला सुन्न करणारी ही दृश्य पाहिल्यानंतर कोरोना व्हायरसमुळे (corona virus) किती भयानक स्थिती निर्माण झालीय, त्याची कल्पना येते. जळणाऱ्या चिता (pyre) आणि पीपीई किटमध्ये (PPE Kit) सतत अंत्यसंस्काराचे काम करुन दमलेले स्मशानभूमीतील कर्मचारी असे चित्र असते. (When a 19 year old in Badlapur crematorium had to light 25 pyres in just 24 hours)

देशातील मुख्य महानगरांमध्ये अशी स्थिती असताना, मुंबईपासून ५० किमी अंतरावर असलेल्या बदलापूरमध्येही यापेक्षा वेगळं चित्र नाहीय. बदलापूरच्या स्मशानभूमीत एका १९ वर्षीय मुलाने २५ चितांना अग्नि देण्यासाठी सहाय्य केले. मुंबई आणि बदलापूर या दोन शहरांची लोकसंख्या आणि जीवनशैली पूर्णपणे भिन्न आहे. पण सध्या एक गोष्ट या दोन्ही शहरांमध्ये समान आहे, ती म्हणजे इथल्या स्मशानभूमीत सतत अत्यंसंस्कार सुरु आहेत.

cremation
'हिम्मत नाही सोडली', कॅप्टनने सांगितला मुंबईतील बेली लँडिंगचा थरार

कोरोनाची साथ येण्याआधी बदलापूरच्या वैकुंठ धाम स्मशानभूमीत दिवसाला दोन ते तीन अंत्यसंस्कार व्हायचे. पण दुसऱ्या लाटेचा कहर सुरु झाल्यापासून इथल्या स्मशानभूमीत दिवसाला २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत आहेत. मुंबई मिररने हे वृत्त दिलं आहे.

cremation
मुंबईत कोरोना रुग्णवाढ कमी झाली, पण एका गोष्टीची भीती

वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी फक्त बदलापूरमधूनच मृतदेह येत नाहीयत, तर अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी आणि वांगणी या शहरातून येणाऱ्या मृतदेहांवरही अंत्यसंस्कार होत आहेत. हिमांशू नेमाडे हा १९ वर्षांचा मुलगा दिवस-रात्र या स्मशानभूमीत काम करतोय. "कोविडच्या आधी कधी-कधी आठवड्याभरात फक्त दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार व्हायचे. पण आता स्मशानभूमीबाहेर रांग लागलेली असते" असे हिमांशू म्हणाला. मागच्या काही महिन्यांपासून इथे स्मशानभूमी २४ तास सुरु आहे. "आपण कोणाच्या मृत्यूची वेळ ठरवू शकत नाही. पहाटे तीनच्या सुमारासही इथे मृतदेह येतात. आम्हाला इथे दिवसभर थांबावे लागते" असे हिमांशुने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com