Mumbai Corona Updates
Mumbai Corona UpdatesTwitter

मुंबईत कोरोना रुग्णवाढ कमी झाली, पण एका गोष्टीची भीती

कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली पण...

मुंबई: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही अधिक धोका असणारी मुंबई प्रत्येक संकटावर मात करत (Mumbai corona update) नव्याने श्वास घेतना दिसू लागली आहे. मुंबईत बरे होणाऱ्यांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ झाली असून मुंबई शहराचा रिकव्हरी रेटमध्ये (recovery rate)आता हळूहळू सुधारणा झाली आहे. मात्र, एकीकडे रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना मृत्यू नियंत्रणाचे (death rate) आव्हान पालिकेसमोर कायम आहे.  तर, आठवडाभरात 500 हून अधिक मृत्यू मुंबईत नोंदवले गेले आहेत. त्यामुळे, रुग्णसंख्येसह कोरोना मृत्यू नियंत्रणात ठेवणे हे कठीण काम पालिकेला करावे लागणार आहे. (Mumbai corona patient decrease recovery rate good but still death rate is high)

45 दिवसांत 2500 हून कमी रुग्णांची नोंद -

रविवारी मुंबईत एकूण 2403 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा  6,76,475 वर पोहोचला. शनिवारी शहरात 2,678 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. 18 मार्चला शहरात 2877 नव्या कोरोनाबाधितांचा इतका कमी आकडा नोंदवण्यात आला. त्यानंतर सातत्यानं रुग्णसंख्येचा आलेख चढताच दिसून आला होता. सलग दुसऱ्या दिवशी 3 हजारांहून कमी रुग्ण आढळण्याची ही मुंबईसाठीची दुसरी वेळ आहे. तर,  गेल्या 45 दिवसांत 2500 हून कमी रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Mumbai Corona Updates
"मुंबईने राष्ट्रीय लॉकडाउन का सहन करायचा?"

सक्रिय रुग्णसंख्येतही घट -

दरम्यान, मुंबईतील कोरोनाचे सक्रिय रुग्ण ही निम्मे झाले आहेत. एका महिन्यात 38 हजारांनी घट नोंदवण्यात आली आहे. आता फक्त आव्हान मृत्यूदर रोखण्याचे असून त्यात यश येण्यासाठी आरोग्ययंत्रणा झटत आहे. गेल्या महिन्यात 8 एप्रिल या दिवशी जिथे 86,279 एवढ्या सक्रिय रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली, तिथे 9 मे या दिवशी ही संख्या कमी होऊन 47,416 वर पोहोचली. म्हणजेच 38, 863 एवढ्या रुग्णांची घट झाली.  

रिकव्हरी रेट ही वाढला -

विशेष म्हणजे 30 दिवसांपूर्वी 80 टक्क्यांवर असलेला रिकव्हरी रेट आता 91 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा दर 153 दिवसांवर पोहोचला असून जो एका महिन्यापूर्वी 33 दिवसांवर होता. त्यामुळे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पालिका प्रशासनाने कोरोनाला आटोक्यात आणण्याचे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे.

Mumbai Corona Updates
कोरोनातून बरे झाल्यानंतर म्यूकरमायकोसिस कशामुळे होतो?

मृत्यूचे आव्हान कायम-

2 ते 9 मे या फक्त एका आठवड्यात मुंबईत 566 मृत्यू झाले आहेत. दर दिवशी 60 ते 70 दरम्यान मृत्यूंची नोंद केली जात आहे. मात्र,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नवीन रुग्णांच्या तुलनेत रविवारी शहरात 3375 रुग्णांनी या संसर्गावर मात केली. ज्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा 6,13,418 वर पोहोचला. तर, 68 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाल्याची माहितीही पालिकेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाली आहे. आतापर्यंत मुंबईत 13,817 रुग्णांना कोरोनामुळं प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता वाढलं असून, हा आकडा 91 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या शहरात 47,416 सक्रिय रुग्ण आहेत.

नवीन रुग्ण   बरे रुग्ण     मृत्यू

2 मे 3672 5542 79

3 मे 2662 5746 78

4 मे 2554 5240 62

5 मे 3879 3686 77

6 मे 3056 3838 69

7 मे 3039 4052 71

8 मे 2678 3608 62

9 मे   2403   3375 68

मृत्यू वाढण्याची भीती कायम -

दरम्यान, मुंबईतील रुग्णसंख्या जरी आटोक्यात आली असली तरी मृत्यू होण्याच्या संख्येत नक्कीच वाढ होऊ शकते असे स्पष्ट राज्य कोविड टास्क फोर्सकडून व्यक्त करण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेत वाढणाऱ्या रुग्णसंख्येसोबत मृत्यूही वाढतात, असे राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

आणखी सुविधा वाढवणार -

मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी पालिकेकडून ती पूर्णपणे निंयंत्रणात येण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत. त्यासाठी आणखी सुविधा वाढवली जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचेल यासाठीही वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, लोकांनी सहकार्य करावे.

सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य)मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com