साहेब, एकदाच चेहरा बघू द्या ना! कोरोनाग्रस्त मृताच्या नातेवाईकांची आर्त हाक 

साहेब, एकदाच चेहरा बघू द्या ना! कोरोनाग्रस्त मृताच्या नातेवाईकांची आर्त हाक 

ठाणे : गेल्या 22 वर्षांत साडेतीन लाखांहून अधिक जणांवर अंत्यविधी केले. लाखो नातेवाईकांना रडताना पाहिले. त्यांचे रडणे पाहून सुरुवातीला मलाही रडू यायचे. पण तीन-साडेतीन लाख जणांचे अंत्यविधी केल्यानंतर डोळ्यातले अश्रू नाहीसे झाले असे वाटत होते. त्यात ज्यावेळेस वडिलांचे निधन झाले, त्यावेळी मला दुख झाले. पण डोळ्यात अश्रूचा थेंब देखील आला नाही. पण कोरोनाने मात्र कोरड्या पडलेल्या डोळ्यात पुन्हा अश्रू आणले आहेत.

कोरोनाग्रस्त मृताची मुलगी, मुलगा, पत्नी जेव्हा म्हणतात, 'साहेब एकदाच चेहरा बघू द्या ना' , तेव्हा मात्र आमच्याही डोळ्यातील अश्रूला वाट मिळते. हे बोल आहेत, ठाण्यातील जव्हारबागेत विद्युत दाहिनीवर काम करणाऱ्या जितेंद्र मकवाना या खऱ्या कोरोना योद्धाचे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जव्हारबाग स्मशानभूमीत काम करणारा जितेंद्र मकवाना हा 1992-93 पासून ठेकेदारी पद्धतीवर प्रेत जाळण्याच्या कामासाठी रुजू झाले. या 22–23 वर्षातील त्यांचे प्रमोशन म्हणजे सरणावर जाळणारी प्रेते आता विद्युत दाहिणीत जाळली जातात. या विभागातील एका पाळीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी या 22 वर्षांच्या काळात अनेक जणांवर अंत्यविधी केला. हे काम करीत असताना मन कठोर झाल्याचे ते सांगतात.

कोरोनाच्या संकटाने त्यांना हलवून टाकले असून त्यांच्या डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. ठाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावल्याने त्याचा अंत्यविधी याच स्मशानभूमीत करण्यात आला. 18 एप्रिलला एका सधन घरातील ती व्यक्ती कोरोनाला पराभूत करू शकली नसल्याने मृत झाली. त्या व्यक्तीचा मुलगा, सून, पत्नी या सगळ्यांना विलगिकरण करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना या व्यक्तीच्या अंत्यविधीत सामील होता आले नाही. त्यांच्या मुलाला स्वतःच्या हाताने अग्नी देता आला नाही. त्याच्यासाठी शेवटचे रडणाराही कोणी नाही, हे पाहून मात्र जितेंद्र यांच्या अश्रूला वाट मिळाली आणि एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच गहिवरले.

रुग्णालयातून त्यांचा देह घेण्यापासून तो दाहिनीमध्ये घालण्यापर्यंत सगळीच जबाबदारी जितेंद्र मकवाना, त्यांचे सहकारी दिनेश मकवाना आणि शशिकांत (संजय) मकवाना यांच्यावर आहे. कोरोना बाधित मृदेह नष्ट करताना खूप काळजी घ्यावी लागते. स्वतःच्या शरीराभोवती पीपीई किट परिधान करून मृतदेह हाताळावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर या आजाराने मृत्यू होणाऱ्यांपैकी जवळपास 200 हुन अधिक मृतदेहांवर विद्युत दाहिणीत अंत्यसंस्कार केले. तसेच स्मशानभूमीत येणाऱ्या प्रत्येक मृतदेहाला आमचा माणूस समजून आम्ही खांदा देतो. तसेच आम्ही त्यांच्या दुखात सहभागी होत असतो. देव करो हा आजार होवू त्यात कोणा
-जितेंद्र मकवाना, 
जवाहरबाग स्मशानभूमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com