esakal | जेंव्हा देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीसांच्या पगाराबद्दल बोलतात...
sakal

बोलून बातमी शोधा

जेंव्हा देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीसांच्या पगाराबद्दल बोलतात...

जेंव्हा देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीसांच्या पगाराबद्दल बोलतात...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी चक्क अमृता फडणवीसांच्या पगाराबाबत वाच्यता केली. आपण जेव्हा घरचं बजेट तयार करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करतो. घरात आपला पगार किती, बायकोचा पगार किती यावरून आपलं बजेट तयार करतो. माझ्या पत्नीचा पगार हा माझ्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो मला जास्त लक्षात राहतो', असं देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तक प्रकाशनावेळेस म्हटलंय. हे केवळ 40 मिनिटामध्ये वाचता येईल, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणालेत. महत्त्वाची बात म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. 

 मोठी बातमी - ​कोरोनासाठी 'मास्क' ऐवजी 'रुमाल' वापरावा का ? उत्तर आहे...

राजकीय टोलेबाजी : 

अर्थसंकल्पा सारख्या विषयावर कधीही बोलण्याची वेळ येईल असं वाटलंही नव्हतं. पण देवेंद्रजी तुमच्यामुळेच माझ्यावर ही वेळ आली असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फडवणीस यांना लगावला. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये देवेंद्र फडवणीस लिखित अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. 

मला अर्थसंकल्पातील फार काही कळत नाही म्हणून तुमचा मित्र म्हणून तुम्ही माझ्यासाठीच हे सोप्या भाषेतील पुस्तक लिहिले असे मी मानतो. असे उद्धव ठाकरे म्हणाले अर्थसंकल्पात सर्व लहान सहान बाबींचा उल्लेख करावा लागतो असे आपण म्हणता मग नोटबंदी सारख्या विषयाचा अर्थसंकल्पात उल्लेख असायला हवा की नको हे तुम्हीच सांगा असा टोला ठाकरे यांनी लगावला पुढील पाच ते दहा वर्ष तुम्ही अशाच प्रकारे सोप्या भाषेत अर्थसंकल्पावर लिहित रहा आम्ही समजत जाऊ असे सांगत ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याचा संदेश दिला.

मोठी बातमी - 'तो' म्हणाला हे काय किती पिंपल्स? तुझ्यापेक्षा तर मेहुणी सुंदर, एवढ्यावरूनच तिनं...

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही फडवणीस यांना मार्मिक चिमटे काढत कोपरखळ्या मारल्या. 

when devendra fadanavis speaks about salary of wife amruta fadanavis