esakal | 'तो' म्हणाला हे काय किती पिंपल्स? तुझ्यापेक्षा तर मेहुणी सुंदर, एवढ्यावरूनच तिनं...
sakal

बोलून बातमी शोधा

मेहुणीशी तुलना केल्याने, तिने केली आत्महत्या!

'तो' म्हणाला हे काय किती पिंपल्स? तुझ्यापेक्षा तर मेहुणी सुंदर, एवढ्यावरूनच तिनं...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : पत्नीच्या चेहऱ्यावर मुरुमे असल्याने ‘बायकोपेक्षा मेहुणी बरी’ असे हिणवणाऱ्या नवरोबाच्या जाचाला कंटाळून पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. तेव्हा अवघ्या पाच महिन्यातच नवविवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. व्ही. ताम्हणकर यांनी ३२ वर्षीय रिक्षाचालक संजय तांगडे याला तीन वर्षे तुरुंगवास आणि १५ हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली; तर पुराव्याअभावी मेहुणीची निर्दोष मुक्तता केली. सरकारी वकील म्हणून संध्या म्हात्रे यांनी काम पाहिले.

ही बातमी वाचली का? सिडकोच्या कामांमधील अनियमितता, फडणवीसांचा पाय खोलात? वाचा कॅगचा रिपोर्ट

रिक्षाचालक संजय तांगडे याचा विवाह मोनिका हिच्यासोबत १० जुलै २०१६ रोजी डोंबिवलीत पार पडला. विवाहानंतर हे दाम्पत्य पती संजयच्या वडिलांकडे उत्तन येथे राहत होते. सप्टेंबर २०१६ रोजी गणेश चतुर्थीला माहेरी गेलेली मोनिका सासरी परतली असता पती संजयने तिला घरात घेण्यास नकार दिला. तसेच, तुझ्या चेहऱ्यावर मुरुमे असून तुझ्यापेक्षा मेहुणी सुंदर दिसते, असे हिणवले. 

ही बातमी वाचली का? कोरोनामुळे तब्बल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव

संजयची मेहुणी त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर राहत होती. यावरून दोघा पति-पत्नीमध्ये भांडणे होऊ लागली. भांडणाला कंटाळून मोनिका आपल्या माहेरी वडिलांकडे आली. मात्र, संजय तिला सासरी नेण्यासाठी इच्छुक नव्हता. यादरम्यान मोनिकाच्या दुचाकीचा अपघातदेखील झाला. तरीही संजयने तिच्याकडे लक्ष दिले नाही. पतीच्या या दुर्लक्षामुळे नैराश्‍येत आलेल्या मोनिकाने २६ नोव्हेंबर २०१६ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

just because she was Compared to the sister in law she took extreme step

loading image
go to top