esakal | शिवाजी पार्कचा स्वीमिंग पूल कधी सुरु होणार? महापौर म्हणाल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor kishori pednekar

शिवाजी पार्कचा स्वीमिंग पूल कधी सुरु होणार? महापौर म्हणाल्या...

sakal_logo
By
सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: दादर शिवाजी पार्क (Shivaji park) येथील महात्मा गांधी जलतरण तलाव (swimming pool) सुरु करण्याची मागणी मागच्या काही दिवसांपासून सुरु आहे. या संदर्भात आज मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांची भेट घेतली. या संदर्भात किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "जलतरण तलाव सुरू करण्याबाबत नागरिकांसोबत चर्चा केली आहे. निवेदन स्वीकारले आहे. अश्विनी भिडे यांच्यासोबत बातचीत केली आहे. मागणीचा नक्कीच विचार करु."

"दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सवलत मिळावी, याकरता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करु. नवीन एसओपी जाहीर केल्या जातील. मुख्यमंत्री निर्णय घेतील" असे महापौर म्हणाल्या. "ओनम नंतर केरळमध्ये रूग्ण वाढले. त्यामुळे गणपती नंतर सर्वसामान्य नागरिकांची तपासणी केली जाते आहे. कोव्हीडसाठी यंत्रणा सज्ज आहे. जास्तीत जास्त टेस्टींग करण्यात येणार आहे" असे महापौर म्हणाल्या.

हेही वाचा: शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत - अनंत गिते

"संपूर्ण लसीकरण झालेल्या सोसायटींवर लोगो लावणार. याने लसीकरण वाढेल. सकारात्मक स्पर्धा वाढेल" असे त्या म्हणाल्या.

संदीप देशपांडे काय म्हणाले...

"स्विमिंग पूल बंद असल्याने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सराव करणं कठीण होते आहे. महापौरांनी निवेदन स्वीकारलं आहे. त्यांची अतिरीक्त आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे" असे संदीप देशपांडे म्हणाले.

loading image
go to top