मुंबई - पुणे - मुंबई एक्स्प्रेस कधी सुरू होणार? रेल्वे प्रशासनाकडून मिळतेय ही माहिती

तुषार सोनवणे
Friday, 4 September 2020

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे देशातील रेल्वे सेवाही थांबवण्यात आली होती.

मुंबई - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे देशातील रेल्वे सेवाही थांबवण्यात आली होती. परंतु गेल्या 5 महिण्यांपासून बंद असलेली पुणे - मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा एक्स्प्रेस आणि लोकल सुरू करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी करीत आहेत. 

8 सप्टेंबरपासून नेस्को कोविड वॉर्डमधील रुग्णांवर होणार आवाजाची चाचणी

मुंबई - पुणे नियमीत अपडाऊन करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे, परंतु गेल्या 5 महिण्यांपासून बंद असलेल्या रेल्वेसेवेमुळे मुंबई - पुणे अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात नुकसान झाले आहे. रेल्वे प्रशासनाची गाड्या सुरू करण्याची पुर्ण तयारी आहे. परंतु राज्य सरकारचीही तयारी असणे अपेक्षित आहे. राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय या मार्गावरील रेल्वे गाड्या सुरू करता येणार नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोरोना काळात रेल्वे सेवा बंद असल्याने रोजगार, व्यवसाय व अन्य रोजीरोटीच्या कामासाठी पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्यात आंतरजिल्हा एसटीला सेवेला परवानगी देण्यात आली असली तरी, या गाड्यांच्या वेळा आणि तिकीट दर सर्वसान्यांच्या आवाक्या बाहेर आहे. त्यामुळे कमीत कीमी सकाळी व सायंकाळी एक एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे. 

काँग्रेस म्हणतेय राम कदमांची नार्को टेस्ट करा,  कदम म्हणाले...

पुणे मुंबई रेल्वेसेवे सोबतच पिंपरी चिंचवड, तळेगाव तसेच लोनावळा येथून अनेक कर्मचारी पुणे शहरात येत असतात. त्यांच्यासाठी ही लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the Mumbai Pune Mumbai Express service start? This information is obtained from the railway administration