esakal | कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये कॉंग्रेसचा 'हा' मोठा नेता मात्र मिसिंग..
sakal

बोलून बातमी शोधा

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये कॉंग्रेसचा 'हा' मोठा नेता मात्र मिसिंग..

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये कॉंग्रेसचा 'हा' मोठा नेता मात्र मिसिंग..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाशिवआघाडीला काँग्रेस हायकमांड सोनिया गांधींनी हिरवा कंदील दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. यानंतर शरद पवारांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी बैठक सुरूंय. या बैठकीला शरद पवार, अहमद पटेल यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अशातच येत्या काही काळात महाराष्ट्रातील सरकारबद्दल अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.  

मात्र अशातच कॉंग्रेसचा एक महत्त्वाचा नेता या सर्व बैठकांपासून दूर असल्याचं पाहायला मिळतंय. या नेत्याचं नाव आहे अशोक चव्हाण. गेल्या  आठवड्यापासून अशोक चव्हाण दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. अशातच चव्हाण यांना या बैठकी पासून दूर ठेवण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्या सोबत झालेल्या बैठकीचं आमंत्रण देखील अशोक चव्हाण यांना नव्हतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान आता शरद पवार यांच्या बंगल्यावर होणाऱ्या बैठीतही देखील अशोक चव्हाण यांना बोलावण्यात आलेले नाही अशीही माहिती आता सूत्रांकडून समोर येतेय. त्यामुळे आता अशोक चव्हाण यांना का बोलावण्यात आलं नाही याबद्दल चर्चांना उधाण आलंय.  

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला महाशिवआघाडी सत्तास्थापनेचा दावा करु शकते. याबाबत आज दिल्लीत काँग्रेसच्या एक्स्प्रेस बैठका झाल्या. या बैठकांमध्ये महाशिवआघाडीच्या फॉर्म्युल्यावर शेवटची चर्चा पार पडली. सुत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि इतर मंत्रिपदं काँग्रेस-राष्ट्रवादी वाटून घेणार असल्याचं कळतंय. सोनिया गांधींचं निवासस्थान असलेल्या 10  जनपथला काँग्रेसची बैठक झाली. तर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरूंय. 

Webtitle : where is ashok chavan during all important meetings of congress and NCP

loading image