esakal | नाराज ओवेसींनी वारिस पठाणांविरुद्ध उचललं मोठं पाऊल, म्हणालेत...

बोलून बातमी शोधा

नाराज ओवेसींनी वारिस पठाणांविरुद्ध उचललं मोठं पाऊल, म्हणालेत...
नाराज ओवेसींनी वारिस पठाणांविरुद्ध उचललं मोठं पाऊल, म्हणालेत...
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर चांगलेच नाराज आहेत. वारिस पठाण गुलबर्ग्यातील एका कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिमांबद्दल वादग्रस्त चिथावणीखोर विधान केला होतं. विशेष म्हणजे यावेळी मंचावर ओवेसीसुद्धा उपस्थित होते. "आम्ही १५ कोटी आहोत मात्र १०० कोटींवर भारी पडू" असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं होतं. या त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

मोठी बातमी - पोलिसांच्या हाती लागलं ८० कोटींचं 'म्याऊ म्याऊ'चं घबाड...

मात्र, आता त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानांवर नाराजी दर्शवली आहे. पुढचे कुठलेही आदेश मिळतपर्यंत माध्यमांशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधू नये, अशी तंबी ओवेसिंनी वारिस पठाण यांना दिलीये. पठाण वारंवार अशी वक्तव्य करतात त्यामुळे वाद निर्माण होतो आणि त्यामुळे समाजात चुकीचा संदेश पसरतो, अशी त्यांच्या पक्षाची भावना आहे. त्यामुळे त्यांना बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती मिळते आहे.

काय बरळले होते वारिस पठाण?

"इट का जवाब पत्थर से' हे आता आम्ही शिकलो आहोत, स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे आणि जर ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्यायची ताकत असू द्या, आम्ही शाहीनबागमध्ये महिलांना समोर केलं. या तर फक्त सिंहिणी आहेत, जर आम्ही सगळे एकत्र आलोत तर काय होईल याचा विचार करा. लक्षात ठेवा आम्ही १५ कोटी आहोत मात्र तुम्हा १०० कोटींवर भारी पडू". असं चिथावणीखोर विधानं वारिस पठाण यांनी केलं होतं.

मोठी बातमी -  मटणावरून मैत्रीत मिठाचा खडा; सुनील मटण संपलंच कसं म्हणत छातीत टाकला...

कोण आहे वारिस पठाण:

वारिस पठाण हे AMIM पक्षाचे माजी आमदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत ते मुंबईच्या भायखळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

media ban on aimim ex mla waris pathan after his controversial statement