चर्चा जोरात आहे, मिठी नदीच्या प्रस्तावावरुन महाविकास आघाडीत मिठाचा खडा

सुमित बागुल
Friday, 27 November 2020

मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी 569 कोटी रुपयांच्या कामाला स्थायी समितीने बुधवारी मंजूरी दिली आहे.

मुंबई, ता. 27 : मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी 569 कोटी रुपयांच्या कामाला स्थायी समितीने बुधवारी मंजूरी दिली आहे. मात्र, हे प्रस्ताव दोन आठवड्यापुर्वी स्थायी समितीनेच फेटाळले होते. यात, पालिकेतील वाद नसून मंत्रालयात झालेल्या "अंडरस्टॅडिंग' असल्याची चर्चा सुरु आहे. मिठी नदीच्या प्रस्तावावरुन महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला चर्चा सध्या सुरु आहे.

महत्त्वाची बातमी : तुम्ही व्हिलनची भूमिका निभावली म्हणूनच मी हिरो बनू शकले"; न्यायालयाच्या निकालांनंतर कंगनाची प्रतिक्रिया

मिठी नदीच्या रुंदीकरणाचे प्रस्ताव प्रशासनाने ऑक्‍टोबर महिन्यात स्थायी समितीच्या पटलावर मांडले होते. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेने हे प्रस्ताव रेकॉर्ड केले. मिठी नदीच्या रुंदीकरणाचे प्रस्ताव रद्द होणे हा सर्वांसाठीच धक्का होता. मात्र, मंत्रालयातील हस्तक्षेपामुळे शिवसेनेने हे प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. हे प्रस्ताव तयार करुन ते स्थायी समितीत आणण्यासाठी कॉंग्रेसच्या पहिल्या वेळेच्या मंत्र्याने पुढाकार घेतला होता. हा आमदार मंत्री होण्यापुर्वीपासून पालिकेच्या कारभारात लक्ष घालून आहे. मात्र, मंत्री झाल्यापासून त्याचा कामामध्ये थेट हस्तक्षेपच होऊ लागला आहे. दरम्यान, हे सर्व हे सर्व "अंडरस्टॅडिंग 'मंत्रालयातून झाल्याने शिवसेनेचे पालिकेतील पदाधिकारीही वैतागले होते.

कॉंग्रेसच्या मंत्र्याकडून होत असलेल्या हस्तक्षेपाला उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुढाकार घेतला. संबंधीतांची बैठक घेऊन पालिकेच्या प्रस्तावांबाबत पालिकेतच 'बोलत'जा असा सल्ला दिला. त्यानंतर पालिकेच्या प्रथेप्रमाणे "अंडरस्टॅडिंग' झाले. शिवसेनेकडून होकार आल्यानंतर प्रशासनाने हे प्रस्ताव पुन्हा सादर केले. त्याला स्थायी समितीने एकाच बैठकीत मंजूरी दिली.

महत्त्वाची बातमी : कोरोनाची लस आल्यावर नागरिकांना देण्याचा प्राधान्यक्रम कसा राहील ? स्वतः राजेश टोपे यांनी दिली माहिती

कॉंग्रेसचे नगरसेवकही नाराज : 

या मंत्र्याच्या पालिकेतील हस्तक्षेपावरुन कॉंग्रेसचे काही नगरसेवक देखील नाराज आहेत. ते नाराजी जाहीर करत नसले तरी मंत्र्यांची ऑर्डर आल्यावर वरीष्ट नेत्यांकडे धाव घेतली जात आहे. मग, राज्यात पक्षाच्या महत्वाच्या पदावर तसेच मंत्रालयातील महत्वाचे मंत्रालय असलेला कॉंग्रेसचा नेता हस्तक्षेप करतो. वारंवार येत असलेल्या तक्रारीमुळे जेष्ट मंत्र्याने 'त्याचे ऐकू नका' असा निर्वाणिचा सल्ला दिला आहे. 

whispers of conflict between mahavikas aaghadi over the issue of mithi river deepening and widening


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whispers of conflict between mahavikas aaghadi over the issue of mithi river deepening and widening