esakal | महिला जास्त खोटं बोलतात की पुरुष, आता मिळालं उत्तर..
sakal

बोलून बातमी शोधा

महिला जास्त खोटं बोलतात की पुरुष, आता मिळालं उत्तर..

महिला जास्त खोटं बोलतात की पुरुष, आता मिळालं उत्तर..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : खोटं बोलण्याबद्दल अनेकदा चर्चा केली जाते. खोटं बोललं की पाप लागतं, असंही बोललं जातं. 'झूठ बोले कव्वा काटे' वगैरे अशा काही प्रसिद्ध ओळी देखील आहेत. खोटं बोलणं चांगली सवय नाही, मात्र कुणाचं खोटं बोलून चांगलं होणार असेल तर त्याला चागलं मानलं जातं. पण तुम्हाला माहितीये का ? महिला आणि पुरुषांमध्येजास्त खोटं कोण बोलतं? याबद्दल अनेक रिसर्च करण्यात आले आहेत . जाणून घेऊयात याच रिसर्च बद्दल.  

ब्रिटनमधील पोर्ट्समाउथ विद्यापीठाच्या मते ज्या व्यक्ती खोटं बोलतात त्या व्यक्ती उत्तम वक्ते असतात.  अशा व्यक्ती इतरांच्या तुलनेत आपले मित्र, आपला परिवार किंवा आपल्या पार्टनर सोबत जास्त खोटं बोलतात. या विद्यापीठाच्या मते पुरुष महिलांपेक्षा उत्तम पद्धतीने खोटं बोलतात. 

महत्त्वाची बातमी :  'वर्षा'वरील रेघोट्यांवर संजय राऊत याचं उत्तर, म्हणालेत...

आभ्यासाकांच्या मते खोटं बोलणाऱ्या व्यक्ती मेसेजेसच्या ऐवजी समोरासमोर खोटं बोलण्याला जास्त पसंती देतात. आणि सोशल मिडीयावर देखील अशी लोकं सर्वात कमी खोटं बोलतात. 

PLOS one या जर्नलच्या मते अर्धसत्य बोलणाऱ्यांची संख्या कमी असते. अशी लोकं आपल्या नजीकच्या लोकांपासून सुटकारा मिळवण्यासाठी किंवा त्यांच्यापासून माफी मिळवण्यासाठी खोटं बोलतात.  

महत्त्वाची बातमी :  मुंबईकरांनो मटन खाताय? जरा थांबा, कारण..

याच संबंधित आणखी एक आभ्यास करण्यात आलाय. यानुसार एक पुरुष साधारणत: एका दिवसात तीनदा खोटं बोलतो. एका वर्षात पुरुष वर्षात 1,092 वेळा खोटं बोलतात. तर दुसरीकडे महिला या वर्षभरात 728 वेळा खोटं बोलतात.  

मात्र या अभ्यासात आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आलीये. यामध्ये काही विशेष परिस्थितीत महिलांचं खोटं बोलण्याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळतं. महिला मुख्यत्त्वे जेंव्हा कपडे खरेदी करतात तेंव्हा त्या जास्त खोटं बोलतात असं यामध्ये म्हटलंय.  

महत्त्वाची बातमी : शेतकरी कर्जमाफी मिळणार पण कंडीशन्स अप्लाय..

याच संबंधित एका अभ्यासात म्हटलंय की, आयुष्य सुखकर करण्याच्या नादात अनेकदा खोटं बोलत असतात. अशातही पुरुष महिलांच्या तुलनेत जास्त खोटं बोलतात हे मात्र या अभ्यासातून स्पष्ट झालंय. 

WebTitle : who is bigger liar men or women here is the answer