लॉकडाऊन शिथिल झाला पण 'ही' काळजी घेणं आवश्यक; WHO नं मास्कबाबत नव्या गाईडलाईन्स केल्या जारी

who
who

मुंबई: जगभरातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल होत असल्याने डब्ल्यूएचओ ने मास्क संबंधी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परिस्थितीत झालेला बदल आणि पुढे आलेल्या नवीन संशोधनामुळे जुन्या मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल केला आहे. 

सर्वसामान्य लोकं तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. डब्ल्यूएचओ चे महासंचालक टेड्रॉस ऍडनोम गॅबेरियस यांनी याबाबत बोलतांना सांगितले की , उपलब्ध पुरावे आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ, नागरी संस्था यांच्या सल्ल्यांचा आढावा घेऊन ही नवीन मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. 

या आहेत नव्या गाईडलाईन्स: 

-- नवीन बदलांनुसार --कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी फेस मास्क घालण्याचे आदेश दिले आहेत. 
-- जिथे जास्त संक्रमण आहे तेथे लोकांनी नेहमी मास्क घालावे. 
-- रेल्वे स्थानके, बस स्थानक रुग्णालये अंडी दुकानं यासारख्या गर्दी असलेल्या ठिकाणी मास्क घालणे फार महत्वाचे आहे.
-- निरोगी लोकांनी थ्री-लेयर फॅब्रिक मास्क घालणे अनिवार्य आहे.
-- यात सुती अस्तर पॉलिस्टरचा बाह्य थर आणि मध्यभागी पॉलीप्रॉपीलिनने बनवलेले फिल्टर असल्याने निरोगी व्यक्तींसाठी एव्हडी खबरदारी पुरेशी आहे
-- केवळ आजारी असलेल्यांंनीच वैद्यकीय ग्रेडचे मुखवटे घालावे.
-- ज्या ठिकाणी संसर्गाची पातळी खूप अधिक आहे तेथे सर्व लोकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. 
-- अधिक संसर्ग असेल तेथे वैद्यकीय दर्जाचे मुखवटे वापरावे. 
-- आरोग्य कर्मचारी तसेच रुग्णालयातील रुग्ण आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी वैद्यकीय दर्जाचे मास्क परिधान करावे. 
-- बाहेर फिरतांना किंवा व्यवहार करतांना गर्दी न करता आवश्यक सोशल डिस्टंसिंग पाळणे महत्वाचे आहे. 

सध्या जगातील अनेक देशांमध्ये पावसाळा तोंडावर आहे. अश्यावेळी मास्क वापरत असतांना मास्कचे काही तोटे देखील लक्षात घेणे आवश्यक आहेत.मास्क ओले झाले असता, कपड्याचे मास्क बदलले नाहीत तर संक्रमित होण्याचा धोका वाढतो. याशिवाय अनेक ठिकाणी मास्क परिधान केलेले लोक त्यामागील गांभीर्य विसरून जातात आणि सामाजिक अंतरावर लक्ष देत नाहीत. डब्ल्यूएचओ ने म्हटले आहे की कोरोना टाळण्यासाठी सामाजिक अंतर आणि वेळेवर हात धुणे देखील खुप महत्वाचे आहे. या धोकादायक कोरोना विषाणूंचा पराभव करण्यासाठी 'फेस मास्क' एक व्यापक रणनीतीचा एक भाग आहे. 

 कोरोना आजारावर औषध सापडलेले नाही. त्यामुळे सर्वोतोपरी काळजी घेणे महत्वाचे आहे.  या व्यतिरिक्त इतर सावधगिरीची पावले देखील अवलंबिली पाहिजेत. केवळ मास्क कोविड19 पासून रक्षण करू शकत नाही. या व्यतिरिक्त शारीरिक स्वछता , हात स्वच्छ ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य संरक्षणासाठी इतर उपाय केले पाहिजेत असे ही डब्ल्यूएचओ ने स्पष्ट केले आहे.
WHO Declared new guidelines for mask read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com