Bhavesh Bhinde: रिक्षा चालकाचा मुलगा कसा बनला होर्डिंगसम्राट? भावेश भिंडेवर बलात्काराचे देखील आरोप

घाटकोपर इथं पेट्रोलपंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगमुळं १४ जणांचा मृत्यू झाला तर ७५ जण जखमी झाले आहेत.
Bhavesh Bhinde
Bhavesh BhindeEsakal

मुंबई : घाटकोपर इथं पेट्रोलपंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगमुळं १४ जणांचा मृत्यू झाला तर ७५ जण जखमी झाले आहेत. या होर्डिंगचा मालक असलेला भावेश भिंडे सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. बेकायदा अशा पद्धतीची होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी यापूर्वी त्याच्या २६ गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर एका बलात्काराच्या केसमध्ये देखील त्याच्यावर गंभीर आरोप असल्याचं आता समोर आलं आहे. पण सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Who is Bhavesh Bhinde become hoarding king in mumbai also accused of rape case)

Bhavesh Bhinde
Modi Hate Speech: PM मोदींवर सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी घाला! सुप्रीम कोर्टाकडून याचिकेची दखल घेण्यास नकार

भावेश भिडे नेमका कोण? ठाकरेंशी काय आहे कनेक्शन?

भावेश भिडे हा इगो मीडिया कंपनीचा मालक आहे. घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग याच इगो मीडिया कंपनीचं आहे. इगो मीडियाकडून मुंबई शहरात मोठे होर्डिंग लावले जातात. भावेशनं सन 2009 साली मुलुंड इथून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती.

Bhavesh Bhinde
Pune News: पुणे पोलिसांनी दाखल केला रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, काय आहे कारण?

वडील रिक्षा चालक तर शिक्षण ९ वी फेल

दरम्यान, भावेश भिंडे याचे वडील रिक्षा चालक होते, गरीबीत दिवस काढलेला भावेश भिंडे हे ९वी फेल आहे. त्यानं काही काळ एका अॅड एजन्सीच्या कार्यालयात ऑफिसबॉय म्हणूनही काम केलं आहे. त्यानंतर त्यानं होर्डिंगचा व्यवसाय सुरु केला. हळूहळू या त्याच्या या व्यवसायानं मोठ्या प्रमाणावर फोफावला. प्रामुख्यानं होर्डिंगचा वापर तो रेल्वेच्या जाहिरातींसाठी करत होता.

Bhavesh Bhinde
Swati Maliwal: "होय, स्वाती मालिवाल यांच्याशी गैरवर्तन झाले, केजरीवाल कारवाई करतील," 'आप'ने स्वीकारले आरोप

बेकायदा होर्डिंगप्रकरणी २६ गुन्हे दाखल

अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना त्यानं निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्याच्यावर सुमारे 26 गुन्हे असल्याचं समोर आलं आहे. हे २६ गुन्हे विनापरवाना होर्डिंग्ज लावल्याप्रकरणीचेच आहेत. हे सर्व गुन्हे सन २००९ पर्यंतचे आहेत.

Bhavesh Bhinde
CM Shinde: मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या 'या' निर्णयाचा ठाणे-पालघरमध्ये होणार महायुतीला फायदा!

मविआनं टक्केवारीतून परवानगी दिल्याचा भाजपचा आरोप

महाविकास आघाडीच्या काळात टक्केवारी घेऊन होर्डिंगसाठी परवानगी दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. भावेशनं शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेत आता प्रशासक आहेत, आमची सत्ता नाही. भावेश भिंडेशी शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचंही संजय राऊत यांनी भाजपच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे.

Bhavesh Bhinde
Marathi News Live Update: महायुतीच्या प्रचारासाठी PM मोदींचा उद्या मुंबईत मोठा 'रोड शो'

काय घडली होती घटना

१३ मे २०२४ रोजी मुंबईत धुळीच्या वादळासह जोरदार वाऱ्यांसह मुसळधार अवकाळी पाऊस बरसला. यावेळी घाटकोपरच्या छेडा नगरमध्ये सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक होर्डिंगसाठी उभारण्यात आलेला महाकाय लोखंडी सांगाडा पेट्रोल पंपावर कोसळला. २५० टन इतकं या होर्डिंगच वजन असल्यांच समजतं. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७४ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. महत्वाचं म्हणजे हे होर्डींग बेकायदेशीर होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com