esakal | WHO ने रेमडेसिवीरला कोव्हिड यादीतून हटवले! मुंबईतील वापरावर डॉक्‍टर ठाम
sakal

बोलून बातमी शोधा

WHO ने रेमडेसिवीरला कोव्हिड यादीतून हटवले! मुंबईतील वापरावर डॉक्‍टर ठाम

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) रेमडेसिवीरला कोव्हिड उपचारांच्या औषध यादीतून वगळले आहे; मात्र मुंबईतील कोरोना उपचारात रेमडेसिवीर कायम असल्याचे समोर आले आहे

WHO ने रेमडेसिवीरला कोव्हिड यादीतून हटवले! मुंबईतील वापरावर डॉक्‍टर ठाम

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) रेमडेसिवीरला कोव्हिड उपचारांच्या औषध यादीतून वगळले आहे; मात्र मुंबईतील कोरोना उपचारात रेमडेसिवीर कायम असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक टप्प्यात रेमडेसिवीरचा वापर केल्यास चांगले परिणाम मिळत असल्याचा निष्कर्ष मुंबईतील डॉक्‍टरांनी काढला आहे. 

हेही वाचा - राज्यातील 14,233 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या लवकरच प्रसिद्ध होणार

कोव्हिड उपचारातील प्रोटोकॉलमध्ये रेमडेसिवीर औषधाला कायम ठेवण्यास जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) विरोध दर्शवला आहे. डब्ल्यूएचओच्या या भूमिकेने यापूर्वी झालेल्या कोरोना उपचारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत; मात्र असे असतानाच मुंबईतील डॉक्‍टर रेमडेसिवीर औषधाच्या वापरावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. एका एकात्मिक चाचणीतून कोरोना रुग्णातील वैद्यकीय सुधारणा आणि मृत्यू प्रमाण रोखण्यास रेमडेसिवीर औषधाचा प्रभाव दिसून आला नसल्याचे कारण डब्ल्यूएचओकडून देण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनावर रेमडेसिवीर या औषधाकडे प्रभावी औषध म्हणूनच पाहिले जात होते; मात्र आता नुकतेच या औषधाला प्रभावी उपचाराच्या यादीतून जागतिक आरोग्य संघटनेकडून वगळण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. 

कोरोना उपचारात रेमडेसिवीर प्रभावी असल्याचा वैज्ञानिक पुरावा नसल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून वगळण्यात आले आहे. 
- डॉ. अविनाश सुपे,

सदस्य, कोरोना मृत्यू निरीक्षण समिती. 

कोरोना लक्षणे विकसित झाल्यापासून चार ते पाच दिवसांच्या आत रेमडेसिवीर वापरल्यास फायदा होतो; मात्र 10 ते 20 दिवसानंतर वापरल्यास त्याचा फारसा परिणाम होत नाही. 
- डॉ. बाळकृष्ण अडसूळ,
अधिष्ठाता, सेव्हन हिल्स रुग्णालय. 

रेमडेसिवीर हे विषाणू प्रतिजन्य इंजेक्‍शन आहे. शरीरात विषाणूचा गुणाकार होऊ नये. म्हणून रेमडेसिवीर इंजेक्‍शन दिले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग झाला की पहिल्या आठवड्यात रेमडेसिवीर इंजेक्‍शन दिले जाते; पण पहिल्या आठ दिवसांत विषाणूचा गुणाकार होतो, हे लक्षात येत नाही. तोपर्यंत रेमडेसिवीरची गरज संपलेली असते. सायकोटाईनस्ट्रॉममध्ये रुग्ण जातोय, असे लक्षात आले की टॉसिलीझुमॅब दिले पाहिजे. 
- डॉ. नीता वर्टी,
माजी प्रमुख, एनएससीआय डोम, वरळी. 

WHO removes Remdesivir from Covid list Doctor insists on use in Mumbai

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image