esakal | संजय राऊत यांना 'कमी' बोलण्याचा कुणी दिला सल्ला ?
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत यांना 'कमी' बोलण्याचा कुणी दिला सल्ला ?

संजय राऊत यांना 'कमी' बोलण्याचा कुणी दिला सल्ला ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात भाजपतर्फे आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सल्ला दिलाय. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेता निवडीची बातमी दिली. मात्र अजित पवार यांची गटनेते पदी केलेली निवड ही वैध आहे, आजच्या निर्णयाने पक्षाच्या बैठकीतला निर्णय हा अवैध होऊ शकत नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय.  

जयंत पाटील यांची निवड राष्ट्रवादीने केली ती अवैध ठरते, कारण संपूर्ण कोरममध्ये ही निवड झालेली नाही, राज्यपाल यांच्याकडे 30 ऑक्टोबरचे जे राष्ट्रवादीचे पत्र गेले त्यामध्ये अजित पवार हे गटनेते आहेत. त्यामुळे नव्याने जयंत पाटील यांची जी निवड केली गेली त्याचं साधं पत्रही राज्यपाल यांच्याकडे पाठवलेले नाही. शहानिशा स्वतः राज्यपाल करत नाहीत असं म्हंटल जातंय. मात्र सर्व कोरममध्ये निवड केली जात नाही तोपर्यंत जयंत पाटील यांची निवड वैध ठरत नाही. 

"भारतीय जनता पक्ष पुन्हा शिवसेनेच्या शोधात... "

जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. अजित पवार यांची नेतेपदाची निवड हीच वैध ठरते. गेल्या महिनाभरातल्या घडामोडी पहिल्यात तर यामध्ये कळीचा नारद हा 'संजय राऊत' आहे. यामधून संजय पराभूत हेच दिसतात. संजय राऊत यांनी पक्षांतर्ग कलह केला.  त्यानंतर सेना भाजपमध्ये रोज विनाकारण टीका करत मैत्रीमध्ये कलह केला असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय. दरम्यान संजय राऊत  जर कमी बोलले तर त्यामध्येच महाराष्ट्रचे हित राहिल अशी भावना आशिष शेलार यांनी व्यक्त केलीये.  

Webtitle : who said sanjay raut should speak less