esakal | विधानपरिषदेवर राज्यपाल कोणाची नेमणूक करणार? महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी
sakal

बोलून बातमी शोधा

विधानपरिषदेवर राज्यपाल कोणाची नेमणूक करणार? महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी

विधानपरिषदेच्या 12 जागांच्या नामनिर्देशनाची तयारी महाविकास आघाडीने केली असल्याची माहिती मिळत आहे.

विधानपरिषदेवर राज्यपाल कोणाची नेमणूक करणार? महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - विधानपरिषदेच्या 12 जागांच्या नामनिर्देशनाची तयारी महाविकास आघाडीने केली असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निर्णय घेऊन, गुरूवारी (29 ऑक्टोबर) राज्यपालांना उमेदवारांची यादी देणार आहेत. या यादीत महाविकास आघाडीच्या मोठ्या आणि इच्छुक नेत्यांची नावे असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - ठाण्यातील क्वारंटाईन सेंटरमधील जेवणाचे बिल नियमानुसार, भाजपच्या आरोपावर पालिकेचं उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. विधानपरिषदेसाठी 12 उमेदवारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षातील इच्छुकांना मोठ्या प्रमाणात पक्षांकडे अर्ज केले होते.त्यात राष्ट्रवादीचे साधारण 300, काँग्रेसचे 50 तर शिवसेनेचे 15 नेत्यांनी विधानपरिषदेत वर्णी लागावी यासाठी अर्ज केले होते. तीनही पक्षातून चार - चार उमेदवारांची नावे दिली जाणार आहेत. विधानपरिषदेत नेमणुक झालेल्या उमेदवारांचा कार्यकाळ 6 वर्षे असतो.  तीनही पक्षातून कोणत्या उमेदवारांची यादी राज्यपालांकडे पाठवली जाऊ शकते हे पाहूया.

शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी

 • सुनिल शिंदे, माजी आमदार
 • सचिन अहिर, माजी मंत्री
 • मिलिंद नार्वेकर, सचिव
 • राहुल कनाल, युवा सेना
 • नितिन बानगुडे पाटील, उपनेते
 • अर्जुन खोतकर, माजी मंत्री
 • आदेश बांदेकर

राष्ट्रवादी पक्षातून संभाव्य उमेदवारांची यादी

 • एकनाथ खडसे
 • आनंद शिंदे
 • उत्तमराव जानकर
 • रविकांत वर्पे
 • विजय भाम्बले 

कॉंग्रेस तर्फे संभाव्य उमेदवारांची यादी

 • महेश मांजरेकर
 • उर्मिला मातोंडकर
 • मुझफ्फर हुसैन
 • हर्षवर्धन सपकाळ
 • मोहन जोशी
 • नसीम खान
 • सत्यजीत तांबे
 • सचिन सावंत
 • अतुल लोंढे
 • डी पी सावंत 

-------------------------------------------------------