Vikramgad Vidhansabha: विक्रमगडमध्ये तिरंगी लढतीत मतांचे विभाजन; कोण मारणार बाजी?

Palghar: मतांच्या विभागणीचा फायदा कोणाला होणार ? या विषयी विक्रमगड विधानसभा क्षेत्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.
Vikramgad Vidhansabha: विक्रमगडमध्ये तिरंगी लढतीत मतांचे विभाजन; कोण मारणार बाजी?
Updated on: 

Mokhada: विक्रमगड विधानसभा मतदार संघात  शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या अपक्ष ऊमेदवारीमुळे तिरंगी लढत निर्माण झाली आहे. येथे महायुती कडून हरिश्च॔द्र भोये ऊमेदवार आहेत. निकमांच्या बंडखोरीमुळे महायुतीच्या मतांची विभागणी झाली आहे.

महाविकास आघाडी कडून सुनिल भुसारा निवडणुकीच्या मैदानात ऊतरले आहेत. सुनिल भुसारा आणि अपक्ष ऊमेदवार प्रकाश निकम हे दोन्ही ऊमेदवार मोखाडा तालुक्यातीलच आहे. त्यामुळे येथुनही मतांच्या विभागणीची होण्याची शक्यता आहे. मतांच्या  विभागणीचा फायदा कोणाला होणार  ? या विषयी विक्रमगड विधानसभा क्षेत्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com