
पाली : दरवर्षी १५ जून रोजी 'जागतिक वृद्ध दुर्व्यवहार प्रतिबंध दिन' साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश वृद्ध व्यक्तींवर होणाऱ्या दुर्व्यवहार, हिंसा, दुर्लक्ष आणि शोषणाविरुद्ध जागरूकता निर्माण करणे हा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २०११ पासून हा दिवस जागतिक स्तरावर पाळण्यास सुरुवात केली आहे.