esakal | "म्हणून राज्यात कोरोना पुन्हा वाढला"; उद्धव ठाकरेंची कबुली
sakal

बोलून बातमी शोधा

"म्हणून राज्यात कोरोना पुन्हा वाढला"; उद्धव ठाकरेंची कबुली

पंतप्रधान मोदींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद 

"म्हणून राज्यात कोरोना पुन्हा वाढला"; उद्धव ठाकरेंची कबुली

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: देशात सर्वत्र कोरोनाचा प्रभाव थोड्या फार प्रमाणात दिसून येत आहे. मात्र देशातील एकूण रूग्णांपैकी सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रातच दिसून येतात. इतर राज्यांमध्ये कोरोना आटोक्यात आणणं शक्य झालंय. महाराष्ट्रातही कोरोनाला रोखण्यात यश आलं होतं पण पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात रूग्णांची संख्या प्रचंड आहे. यामागे कारण काय असा सवाल उपस्थित होत होता. त्याचे उत्तर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी रूग्णवाढीची कारणे सांगितली.

माझा महाराष्ट्र कोविडच्या लढ्यात मागे नव्हता, कधीही राहणार नाही!

"गेल्या सव्वा वर्षांपासून आम्ही सर्व कोविडची लढाई लढतो आहोत. मधल्या काळात संसर्गाची लाट थोपविण्यात आपल्याला यश आले होते. महाराष्ट्रात आधी तीन हजार रुग्ण आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्रानेदेखील काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ यांच्या आयोजनाने साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला व कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. जगात इतर ठिकाणीही असेच होत होते. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली", अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा बंद होणार? मंत्र्यांचे महत्त्वाचे वक्तव्य

"सध्या कोरोनाला आटोक्यात आणण्याची खूप गरज आहे. राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. आताची कोविडबाधित रुग्णांची संख्या पहाता १७००-२५०० मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची एप्रिल अखेरपर्यंतची मागणी असेल. त्यामुळे पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा होणे ही अत्यंत निकडीची आणि अत्यावश्यक स्वरूपाची गरज आहे. त्याचा पुरवठा केला जावा", अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केला.

काळजी घ्या! कोरोना विषाणूची आणखी तीन लक्षणं आली समोर

"देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमडीसिवीरचा पुरवठा व्हावा. या औषधाच्या किंमतीवर ड्रग कंट्रोलरचे नियंत्रण असावे. महाराष्ट्रामध्ये आजघडीस रेमडिसीवीरच्या साधारणत: 50 ते 60 हजार बाटल्यांचा वापर सुरु आहे. सक्रिय रुग्णांची संख्या लक्षात घेता ही एप्रिल अखेरपर्यंत ही गरज प्रतिदिन ९०  हजार ते १ लाख बाटल्या याप्रमाणे वाढू शकते. अनेक ठिकाणी केवळ सिटी स्कॅन केलेल्या रुग्णाला रेमडिसीवीर दिले जाते. ICMRलाही रेमडिसीवीरचा हा अति व गैरवापर होऊ नये म्हणून त्याच्या वापराचा प्रोटोकॉल निश्चित करण्याची विनंती आहे. रेमडिसीवीरची निर्यातही थांबवावी", अशी विनंती ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली.

"केंद्राने जादा 1200 व्हेंटीलेटर्स द्यावेत. तसेच जे पाठवले आहेत ते सध्या तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. त्या सुरु करण्यासाठी तंत्रज्ञ द्यावेत आणि ते व्हेंटीलेटर ऑपरेशनल करून द्यावेत. तसेच हाफकिनला लस उत्पादन परवानगी लवकर मिळावी. हाफिकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, परेल येथे कोव्हॅक्सिनचे उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला आहे. तो लवकर मान्य झाल्यास तंत्रज्ञान हस्तांतर प्रक्रियेने दरवर्षी 228 दशलक्ष डोस तयार करण्यात येतील व लसीकरण मोहिमेला वेग येईल", असेही मुख्यमंत्री म्हणाले.

loading image