मुंबईत का फोफावतोय कोरोना ? कारण 'याचा' विचार झालाच नाही... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना झपाट्याने फैलावतोय. मुंबईची 60 टक्के लोकसंख्या दाटीवाटीच्या झोपडपट्टयांमध्ये रहात आहे.

मुंबई - झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना झपाट्याने फैलावतोय. मुंबईची 60 टक्के लोकसंख्या दाटीवाटीच्या झोपडपट्टयांमध्ये रहात आहे. या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, याचा विचार झाला नाही. त्यानुसार नियोजन झाले नाही. स्वच्छतेच्या योजनांकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे झोपडपट्टयांमधील कोरोना नियंत्रणाबाहेर गेल्याचे मत मुंबई महापालिकेचे निवृत्त विशेष कार्य अधिकारी आनंद जगताप यांनी यांनी व्यक्त केले. 

मुंबईचे 12 टक्के क्षेत्र दाटीवाटीच्या झोपड्यांनी व्यापले आहे. स्वच्छता, पाणी, आरोग्य, शिक्षण या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. आता कोरोनामुळे दुर्लक्षित राहिलेले हे प्रश्न आता प्रकर्षाने जाणवू लागले असल्याचे त्यांनी स्प केलंय. माजी विशेष कार्य अधिकारी जगताप म्हणाले की, झोपडपट्ट्यांकडे वोट बँक म्हणून पाहिले गेले. तिथे दर्जेदार सुविधा पूरविण्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. झोपडपट्ट्यातील शौचालयांची अपुरी सुविधा, त्यात पाणी, वीज, स्वच्छता नाही. सार्वजनिक शौचालयामुळे आता झोपडपट्ट्यामध्ये कोरोना झपाट्याने पसरत असून ही चिंतेची बाब ठरली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

मुंबईकरांच्या मनात ट्रेनची दहशत? लॉकडाऊन नंतर मुंबईकर लोकलने प्रवास करणार का ? मुंबईकर म्हणतायत

स्वच्छ भारत अभियान आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार 1 सीट 30 नागरिकांसाठी वापरावे, 500 मीटरवर एक शौचकूप सुविधा असावी, असा निकष आहे. हा निकष कुठेच नाही. शौचालयांची  दुरावस्था, अस्वच्छता, अपुरी शौचालय व्यवस्था यामुळे कोरोनाचा वाढत असल्याचे दिसत आहे. आता एका रात्रीत उपाययोजना होणार नाहीत. कोरोनाचा नियंत्रणात येताच झोपडपट्ट्यात प्रभावी उपाय योजना आणि सुविधा पुरवाव्या लागतील असे मत त्यांनी व्यक्त केले. 

मुंबईत येणारे लोंढे रोखता येणार नाहीत. हे लोंढे येताच राहणार. ते याच वस्त्यांमध्ये स्थिरावणार. त्यासाठी वस्त्यांमधील पायाभूत सेवा सुविधांवर भर ध्यायला हवा असेही त्यांनी स्पष्ट केले.

why corona is spreading in mumbai retired work officer speaks about this


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why corona is spreading in mumbai retired work officer speaks about this