esakal | ..म्हणून विनोद तावडे भेटलेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना
sakal

बोलून बातमी शोधा

..म्हणून विनोद तावडे भेटलेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना

..म्हणून विनोद तावडे भेटलेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : राज्यात कुणाचं सरकार येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत असं सूत्रांकडून सांगण्यात येतेय. या घडामोडींमध्ये आता भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि विनोद तावडे यांच्यात तब्बल चाळीस मिनिटं चर्चा झाली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून विनोद तावडे हे मुख्यमंत्र्यांना भेटले असल्याची माहिती आता समोर येतेय. राज्यातील सत्तास्थापनेच्या विविध पर्यायांवर विनोद तावडे आणि कोश्यारी यांच्यात चर्चा झाली अशी. सध्याच्या राजकीय घडामोडी आणि सत्तास्थापनेचे पुढील पर्याय यावर चर्चा करण्यात आली अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चर्चेआधीच विनोद तावडे यांनी राज्यपालांची भेट घेतलीये.

भारतात 'या' शहरातील तरुण सर्वात आधी गमावतात आपली व्हर्जिनिटी..

आजच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय. शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपची दारं 24 तास उघडी असल्याचंही पाटील यांनी म्हटलंय.

आता बास, 48 तासानंतर शिवसेना अॅक्टीव्हेट करणार आपला प्लान 'B'

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी नेतेही राज्यपालांच्या भेटीला    

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचं शिष्टमंडळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटण्यास आले होते. अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि इतर विषयांवर राज्यपालांशी करणार चर्चा झाली. राष्ट्रवादीतर्फे अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, धिरज देशमुख, शरद रणपिसे, हुस्नबानू खालीफे हे या भेटीदरम्यान उपस्थित होते. 

भाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंना शरद पवार आणणार एकत्र ?