अयोध्येतील जमीन घोटाळ्याची चौकशी का नाही करत? - संजय राऊत

"अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी कवडीमोल किंमतीने जमिनी घेतल्या व कोट्यवधी रुपयांना श्रीराम जन्मभूमी न्यासाला विकल्या."
sanjay raut
sanjay rautsakal

मुंबई: "राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात आहेत. केंद्रीय पथके येथे येतात आणि कोणाच्याही दबावाखाली येथे येऊन कार्यवाही करतात, हे संघराज्य पद्धतीला हानीकारक आहे" अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्याविरोधात ईडीकडून (ed) सुरु असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे विधान केले. (Why ed is not doing enquiry of ayodhaya land scam sanjay raut)

सध्या अयोध्यतील (Ayodhya) राम मंदिर(Ram Mandir) जमीन घोटाळा सर्वात मोठा असून ईडी तिथे चोकशी का करत नाही? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. "शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या जमीन व्यवहार प्रकरणात घोळ आहे म्हणून त्यांना त्रास देत ‘ईडी’ने त्यांची चौकशी सुरु केली. पण सध्या सगळ्यात मोठा जमीन घोटाळा अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात झाला आहे. अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी कवडीमोल किंमतीने जमिनी घेतल्या व कोट्यवधी रुपयांना श्रीराम जन्मभूमी न्यासाला विकल्या. हा सुद्धा ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’ तपासाचा विषय आहे, पण ते सर्व मोकळेच आहेत" अशी टीका राऊत यांनी केली आहे.

sanjay raut
मुंबई: कॉलेजचा ऑनलाईन वर्ग सुरु असताना लागला पॉर्न व्हिडीओ

"विरोधी पक्षाने जबाबदारीनं वागावं अशी या जनतेची अपेक्षा आहे. पण जर ती जबाबदारी पाळत नसाल तर आपण जनतेला ज्ञान देण्यात अपुरे पडत आहोत. आपल्यात काही कमतरता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने कारवाया होत आहेत" असे राऊत म्हणाले. "सत्ता गेल्यावर ज्यांना नैराश्य आले आहे, त्यांनी नैराश्यातून आणि वैफल्यातून अशा प्रकारच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे. सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख नेत्यांवर ठरवून कार्यवाही केली जाते" असे राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com