ऑनलाईन शिकवणीदरम्यान टिकली, बांगड्यांना बंदी का ?

women's strike
women's strikesakal media

मुंबई : शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान (Hijab controversy) करणे हे आमचे निर्णयस्वातंत्र्य आहे, असा वादंग कर्नाटकमध्ये (Karnataka) होत असताना मुंबईतील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या (English medium school) ऑनलाईन शिकवण्यांना (online classes) हिंदू मुलींना कपाळावर कुंकू, टिकली, बांगड्या आणि मेंदी (Hindu Accessories) आदी धार्मिक बाबींवर बंदी का, या मुद्यावरून भाजपने (bjp) रणशिंग फुंकले आहे.

women's strike
महाविकास आघाडीत बिघाडी! रायगडचे पालकमंत्री बदलण्याची शिवसेनेची मागणी

कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये असे प्रकार होत असल्याचा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. धर्म घरात ठेवावा, असे सांगितले जाते, मात्र ऑनलाईन शिकवण्यांना हिंदू विद्यार्थिनी त्यांच्या घरात असतानाही त्यांच्यावर धर्म न पाळण्याची बंधने लादली जातात. इतर धर्मियांना धार्मिक प्रथा पाळण्याचे स्वातंत्र्य असताना फक्त हिंदूंवर बंधने लादणे हा धार्मिक भेदभाव असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार गुरुवारी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी ग्रान्ट रोड येथील एका कॉन्व्हेन्ट शाळेसमोर आंदोलन केले.

या शाळेत फक्त हिंदू धार्मिक परंपरा पाळण्यास विरोध केला जातो, असा दावाही भाजपतर्फे करण्यात आला. भाजपच्या युवती मोर्चाच्या वतीने शाळेसमोर घोषणाबाजी करण्यात आली. शाळेच्या ऑनलाईन शिकवण्यांना मुलींना कपाळावर टिकली लावू दिली जात नाही. हातावर मेंदी काढू दिली जात नाही, बांगड्यांना परवानगी नसते. कान टोचलेले असतील तर बारीक कर्णफुले चालतात, मात्र नाकातील रिंग काढण्यास सांगितली जाते, हा भेदभाव निषेधार्ह आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

‘धर्माचा म्हणून पालक शांत’

शाळेचा गणवेश वा गणवेष आम्हाला मान्य आहे, मात्र त्यातही सर्वांना समान न्याय असावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. दुसरे म्हणजे शिक्षकांनी मुलींना टिकली, बांगड्या काढण्यास सांगितल्याने ही आभूषणे चूक आहेत असे संस्कार मुलींवर होतात, असे एका पालकाने सांगितले. ही बाब गेली मुंबईत जवळपास सर्वच कॉनव्हेंट शाळांमध्ये अनेक वर्षे सुरू आहे. शाळेचे नियम पाळणे, आपल्या मुलांचे भवितव्य व इतरांच्या धर्माचा मान ठेवावा म्हणून इतके दिवस पालक शांत राहिले. मात्र आता सर्वत्र धार्मिक भेदभाव सुरू झाल्याने आम्ही का शांत रहावे, असाही प्रश्न यावेळी पालकांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com