
शिवसेनेनं का दिली उमेदवारी? अहिर, पाडवींनी सांगितलं कारण
मुंबई : विधान परिषदेसाठी शिवसेनेनं सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. आज हे दोन्ही उमेदवार आपला अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आपल्याला शिवसेनेनं का संधी दिली? याच स्पष्टीकरण दिलं. (Why Shiv Sena gave opportunity for Vidhan Parishad Sachin Ahir Amshya Padvi gives reason)
हेही वाचा: जामखेडमध्ये भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम', रोहित पवार निशाण्यावर!
अहिर म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी माझी निवड करण्यात आली आहे. तर आदिवासी भागातील शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी पाडवींची निवड झाली आहे. या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन काम करण्यास आम्हाला सांगण्यात आलं आहे. माझ्या प्रशासनाच्या अनुभवाचा फायदा घेऊन वरळी आणि महाराष्ट्राच्या कानाकोरपऱ्यात पक्ष कसा घेऊन जाता येईल यासाठी माझा प्रयत्न राहिल.
हेही वाचा: HSC Result 2022: बारावीत यंदाही कोकण विभागाची बाजी; निकाल जाहीर
पाडवी म्हणाले, आमच्यावर पक्षप्रमुखांनी मोठा विश्वास ठेवला आहे. या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. गुजरात-मध्य प्रदेशच्या सीमेवर माझा तालुका आहे. आजपर्यंत आदिवासी समाजाला विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही, पण आता माझ्या रुपानं ती संधी मिळाली आहे. त्यामुळं आम्हाला मोठा न्याय मिळाला आहे असं वाटतंय.
निवडणुकांमध्ये खडा टाकण्याचा भाजपचा प्रयत्न
राज्यसभेत आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत खडा टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. पण आम्हाला आत्मविश्वास आहे की राज्यसभेच्या निवडणुकीतूनच हे स्पष्ट होईल की, संख्याबळ कोणाकडे आहे. त्यामुळं दहा तारखेलाच हे स्पष्ट होईल, की बहुमत कोणाकडे आहे, असं यावेळी सचिन अहिर म्हणाले.
Web Title: Why Shiv Sena Gave Opportunity For Vidhan Parishad Sachin Ahir Amshya Padvi Gives Reason
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..