"मुंबईने राष्ट्रीय लॉकडाउन का सहन करायचा?"

BMC आयुक्त चहल यांचा संतप्त सवाल
"मुंबईने राष्ट्रीय लॉकडाउन का सहन करायचा?"

मुंबई: सध्या देशात केंद्र सरकार (Indian Government) विरूद्ध बिगरभाजप शासित (Non BJP Government) राज्य असा संघर्ष पाहायला मिळतोय. देशात कोरोनाची (Coronavirus) आकडेवारी वाढत असताना पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) मात्र लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असल्याचे मत व्यक्त करत आहेत. पण बिगरभाजप शासित राज्यांतील नेतेमंडळी मात्र केंद्र सरकारने लॉकडाउन (Lockdown) करावं, अशी मतं व्यक्त करत आहेत. या मुद्द्यावर मुंबई पालिकेचे (BMC) आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal SIngh Chahal) यांनी रोखठोक मत व्यक्त केलं. (Why Should Mumbai suffer National Lockdown Asks BMC Commissioner Iqbal Singh Chahal)

"मुंबईने राष्ट्रीय लॉकडाउन का सहन करायचा?"
"जे 'मुंबई मॉडेल'वर हसतात, त्यांना माहिती कशी देऊ?"

"कोणत्याही गोष्टी एकाच ठिकाणी केंद्रित असून नयेत अशा विचारसरणीचा मी आहे. जर मुंबईतील लॉकडाउनमुळे रूग्णसंख्येचा दर कमी आला असेल तर याचा अर्थ त्या पद्धतीचा लॉकडाउन परिणामकारक ठरताना दिसतोय. जर मुंबईत आता रूग्णसंख्या वाढीचा दर केवळ ६ ते ७ टक्के इतकाच असेल, तर मुंबईने राष्ट्रीय लॉकडाउन का सहन करायचा?", असा सवाल त्यांनी केला. "लॉकडाउन हा मुद्दा राज्यांवर सोडायला हवा. प्रत्येक राज्याची प्रवृत्ती वेगळी असते त्यामुळे राज्यांना त्यांचे-त्यांचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हवं", असं स्पष्ट मत त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना व्यक्त केलं.

"मुंबईने राष्ट्रीय लॉकडाउन का सहन करायचा?"
राजकीय आरोप झेलत BMC आयुक्त चहल यांची वर्षपुर्ती

कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन हे प्रभावी माध्यम आहे, असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल आयुक्त चहल यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नाचेही त्यांनी आपल्या शब्दात उत्तर दिले. "मुंबई आणि महाराष्ट्रात लॉकडाउन काहीसा वेगळ्या पद्धतीचा होता आणि त्यामागे काही ठोस कारणं होती. पहिला लॉकडाउन हा २५ मार्च ते १४ मे इतका मोठा होता. त्यावेळी सारं काही बंद होतं. पण यावर्षी आपण लॉकडाउनमध्ये लसीकरण थांबवू शकत नाही. गेल्या आठवड्यात लॉकडाउन असूनही आम्ही दिवसाला ७५ हजार लोकांचं लसीकरण केलं. दुसरी गोष्ट, अनेक लोक मुंबईच्या लॉकडाउनची खिल्ली उडवतात. ते म्हणतात की सगळंच सुरू आहे. टॅक्सी, रिक्षा सुरू आहेत. विमानतळ सुरू आहे. पण त्यांना मी हे सांगतो की अशाच प्रकारच्या लॉकडाउनमुळे आम्ही रूग्ण संख्येचा दर खाली आणला", असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com