esakal | सिरो सर्व्हेला नागरिकांचा का मिळतोय अल्प प्रतिसाद? चाचणी पॉझिटिव्ह येण्याची लोकांमध्ये भीती
sakal

बोलून बातमी शोधा

सिरो सर्व्हेला नागरिकांचा का मिळतोय अल्प प्रतिसाद? चाचणी पॉझिटिव्ह येण्याची लोकांमध्ये भीती

सिरो सर्व्हेच्या पदाधि-यांना लोकांमध्ये जनजागृती करण्यास तसेच समजावण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यात सिरो सर्व्हेच्या दुस-या टप्प्याला सुरूवात करण्यात आली आहे.

सिरो सर्व्हेला नागरिकांचा का मिळतोय अल्प प्रतिसाद? चाचणी पॉझिटिव्ह येण्याची लोकांमध्ये भीती

sakal_logo
By
मिलिंद तांबे


मुंबई  - लोकांना कोरोना संसर्ग होऊन गेला आहे का...कोरोना समूह संसर्गा पर्यंत पोहोचला आहे का याची माहीती घेण्यासाठी सिरो सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.त्याचा पहिला  टप्पा पुर्ण झाला असून दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मात्र मुंबईतील पहिल्या सिरो सर्व्हेला ब-याच ठिकाणी विरोध झाल्याने अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यातून कसा - बसा मार्ग काढण्या-या पालिकेला आता सिरो सर्व्हेच्या पदाधि-यांना लोकांमध्ये जनजागृती करण्यास तसेच समजावण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यात सिरो सर्व्हेच्या दुस-या टप्प्याला सुरूवात करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची मुदत वाढली; आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयाविषयी जाणून घ्या

मुंबई पालिकेने जुलै महिन्यात स्लम आणि नॉन स्लम परिसरात सिरो सर्व्हे केला. हा सिरो सर्व्हेचा पहिला टप्पा होता.  आर उत्तर-दहिसर, एम वेस्ट-चेंबूर,तिलकनगर,एफ उत्तर - वडाळा,सायन,माटूंगा या तिनही विभागांत सिरो सर्व्हे करण्यात आला होता. पहिल्या सर्व्हेत नॉन स्लम मधून 4 हजार सँपल घेण्यात येणार होते मात्र काही इमारतींमधील रहिवाश्यांनी विरोध केल्याने केवळ 2,707 इतकेच सँपल घेण्यात आले.त्यामुळे इमारतींमध्ये राहणा-या रहिवाश्यांचा अपेक्षित सर्व्हे झाला नाही. त्यामुळे पालिकेने आता लोकांना समजावण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या सिरो सर्व्हे मध्ये झोपडपट्टी भागातील 57 टक्के तर इतर भागात 16 टक्के लोकं कोरोनामुळे प्रभावित झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पहिल्या सिरो सर्व्हेत झोपडपट्टीत भागातील 80 टक्के लोकं तर झोपडपट्टी भागातील 30 टक्के लोकं सँपल देण्यास तयार होते.

VIDEO! मिठी नदी खालील मेट्रो 3 प्रकल्पाचे भुयारीकरणाचे काम पूर्ण; गोदावरी 4 टनेल बोरिंग मशीनची कमाल

10 ऑगस्ट पासून सिरो सर्व्हेच्या दुस-या टप्प्याला सुरूवात करण्यात आली. दुस-या टप्प्यात चेंबूर,दहीसर आणि माटुंगा या परिसरात सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत 2,349 लोकांसोबत संपर्क करण्यात आला. मात्र त्यापैकी केवळ 1200 जणांनी सिरो सर्व्हेत सहभागी होण्यासाठी तयारी दर्शवली आहे. पालिकेला दोन आठवड्यात 6,500 सँपल गोळा कऱण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र प्रत्यक्षात गेल्या नऊ दिवसात केवळ 1200 नमूने गोळा झाले आहेत. इमारती परिसरात सिरो सर्व्हेला ब-यापैकी प्रतिसाद मिळत आहे मात्र झोपडपट्टी परिसरात मात्र रक्ताचे नमुने देण्यास तसेच सर्व्हेला कडाडून विरोध होत आहे.

कुठल्या भागात होतोय सिरो सर्व्हेचा दुसरा टप्पा

  • -चेंबूर एम पश्चिम विभाग
  • -दहिसर आर उत्तर विभाग
  • -माटुंगा एफ उत्तर विभाग 

सिरो सर्व्हे बाबत लोकांच्या मनात भिती 
सिरो सर्व्हे तसेच एंटीबॉडी टेस्ट बाबत लोकांमध्ये काही प्रमाणात गैरसमज तसेच भिती देखील आहे. त्यामुळे लोकं या टेस्टसाठी फारसे उत्सूक दिसत नाहीत.  मात्र त्यांच्या मनातील ही भिती दूर करण्याचा प्रयत्न कऱण्यात येत आहे . मात्र स्लम पेक्षा इमारतींमधील रहिवाशी एँटीबॉडी टेस्टला अधिक विरोध करत असल्याचे  एम पश्चिम विभागातील एका स्वयंसेवकाने सांगितले. स्लम मध्ये आम्हाला अनेक लोकं सहकार्य करतात,मात्र इमारतींधील अनेक लोकं साधा दरवाजा ही उघडत नसल्याचे ही त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर काही रहिवाशी शिवीगाळ करत आम्हाला पिटाळत असल्याचे ही त्याने पुढे सांगितले.

सिरो सर्व्हे बाबत गैससमज

  • -सिरो सर्व्हे बाबत लोकांच्या मनात भिती आणि अनेक गैरसमज 
  • -चाचणीत पॉझिटिव्ह येण्याची भिती
  • - पालिका अधिकारी प़कडून रूग्णालयात नेण्याची भिती 
  • -पॉझिटीव्ह आल्यास 14 दिवस क्वारंटाईन करण्याची भिती 

काय आहे सिरो सर्व्हे
सिरो सर्व्हे मध्ये व्यक्तीच्या शरिरातील रक्त घेवून त्याची एँटीबॉडी टेस्ट केली जाते. जर का एखादा व्यक्ती कोरोना बाधित होऊन गेला असेल तर त्याच्या शरिरात विकसित झालेल्या एंटीबॉडी ची माहीती या सर्व्हेतून मिळणार आहे. या माहितीमुळे कम्यूनिटी स्तरावर हा आजार किती प्रमाणात पसरला आहे याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

लोकांच्या जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. नॉन स्लम परिसरातील लोकांनी या सिरे सर्व्हे मध्ये सहकार्य  करावे यासाठी विभाग अधिकारी तसेच स्वयंसेवक घराघरात जाऊन लोकांना समजावत आहेत. या सर्व्हेमुळे कुणालाही त्रास होणार नाही 
डॉ. दक्षा शाह , उप कार्यकारी आरोग्य अधिकारी 
..................................................
कोविड प्रोटोकॉल पाळून पीपीई किटसह आमची टिम रक्त नमुणे गोळा करताहेत. मात्र कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भितीने शिबिराकडे फिरकत नाही. या सर्व्हेवरुन राज्य सरकारला कोरोना संदर्भात उपयुक्त माहिती मिळणार आहे. या आधारावर सरकारचे कोविड उपचाराचे धोरण आखायला मदत होईल.
- गायत्री लोबो,
सदस्य, सिरो सर्व्हे पथक

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top