लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी का नाही? हायकोर्टाचा महाराष्ट्र सरकारला सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

local train

लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी का नाही? हायकोर्टाचा सवाल

मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसीचे (covid preventive vaccine) दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकल प्रवासाची (local travel) परवानगी का देत नाहीय? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) महाराष्ट्र सरकारला (Maharashtra govt) विचारला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतल्यानंतरही नागरिकांना घरातच थांबावे लागणार असेल, तर लसीचे दोन डोस घेण्याचा उपयोग काय? असा सवाल मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमुर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने विचारला आहे.

सर्व वकील, न्यायालयीन क्लार्क आणि कोर्ट कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अनुत्सुक असल्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टात सांगितले. त्यावेळी खंडपीठाने लसीचे दोन डोस घेण्याचा उपयोग काय? असा सवाल विचारला.

हेही वाचा: 'आमचा सी.एम जगात भारी', मनसेने मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य

लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. कोरोनाची साथ सुरु होण्याआधी दिवसाला ७५ लाख नागरिक लोकलने प्रवास करायचे. सध्या फक्त कोरोना योद्धे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी आहे.

हेही वाचा: मुंबई विमानतळावरील 'अदानी एअरपोर्ट्स'चे बोर्ड शिवसैनिकांनी फोडले

वकील आणि खासगी व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय सुनावणी करत होते. कामकाजासाठी वकीलांना लोकल आणि मेट्रो रेलने प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.

Web Title: Why Vaccinated People Cant Be Allowed To Travel By Local Train Bombay Hc Asks Maharashtra Govt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..