
'आमचा सी.एम जगात भारी', मनसेने मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी टि्वटमधुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेत (BMC) शिवसेनेची सत्ता आहे. तोच धागा पकडून संदीप देशपांडेंनी लक्ष्य केले आहे. मागच्या काही दिवसांपासून ते निर्बंध शिथील करण्यावरुन सातत्याने सरकारला लक्ष्य करत आहेत. (Mns leader sandeep deshpande slam chief minister uddhav thackeray dmp82)
"पाहिले एकच म्हण होती "तळे राखी तो पाणी चाखी" या सरकारच्या काळात अनेक नव्या म्हणींचा जन्म झालाय" असे संदीप देशपांडे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. "मराठी भाषेला नवीन म्हणी बहाल केल्याबद्दल मुख्यमंत्रांचे जाहीर आभार" असे उपरोधिक शब्दात म्हटले आहे.
हेही वाचा: दक्षिण मुंबईला कोरोनाचा विळखा, बाधितांच्या लसीकरणाची तपासणी
मनसेने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरु करण्यासाठी आंदोलन छेडण्याचाही इशारा दिलाय. लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी (common public) बंद करण्यात आला होता. अजूनही लोकल सुरु झालेली नाहीय. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांकडून सातत्याने लोकल प्रवास सुरु करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा: कोविड नियमांचे पालन करुन यंदा लालबागच्या राजाचा दरबार सजणार
कोरोना प्रतिबंधक लसीचे ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अन्यथा महाराष्ट्र सैनिक रेल भरो आंदोलन करतील, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास खुला करावा, अशी मागणी केली होती.
Web Title: Mns Leader Sandeep Deshpande Slam Chief Minister Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..