esakal | आर्यन खानला का झाली अटक?; जाणून घ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan khan

आर्यन खानला का झाली अटक?; जाणून घ्या...

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थान एनसीबीनं अटक केली आहे. त्याला नक्की कोणत्या कारणासाठी अटक करण्यात आली याची माहिती एनसीबीनं दिली आहे. आर्यनच्या अरेस्ट मेमोमध्ये याचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे.

काय आहे अरेस्ट मेमोमधील तपशील?

आर्यन खानला आज (रविवारी) दुपारी 2 वाजता NCB कडून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या मेमोमध्ये आर्यनने ड्रग्ज खरेदी केल्याचा तसेच स्वत : जवळ ते बाळगल्याचा आणि त्याची विक्री केली केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. आर्यनजवळ 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या 22 गोळ्या जप्त केल्या आहेत. ज्याची बाजारात किंमत 1 लाख 33 हजार रुपये आहे.

दरम्यान, ज्या क्रुझवर या रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्डिलिया क्रुझच्या मालकाला एनसीबीनं चौकशीला बोलावलं होतं. यानंतर पुन्हा गरज लागल्यास आपण हजर राहू असंही त्यानं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. "ड्रग्ज प्रकरणाची आमची जबाबदारी नव्हती. ही पार्टी होणार होती हे आम्हाला माहिती होतं. पण त्यात ड्रग्जचा वापर होणार हे माहीत नव्हतं" अशी माहिती कार्डिलियाच्या मालकानं NCB च्या तपास अधिकाऱ्यांना दिली.

काय आहे प्रकरण?

शनिवारी (२ ऑक्टोबर) एनसीबीने मुंबईकडून गोव्याला जाण्याऱ्या क्रूझ जहाजावर छापेमारी केली. यावेळी 13 जणांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश होता. या पार्टीसाठी जवळपास 600 जणांची उपस्थिती असल्याचंही समोर आली आहे. या रेव्ह पार्टीत कोकेन, चरस, मेफेड्रोन, एक्सटसी अशा प्रकारचे ड्रग्जचा वापर झाल्याचंही तपासात समोर आलंय. आर्यनचा मोबाइलही एनसीबी जप्त केला आहे.

loading image
go to top