esakal | Wife Meaningless Allegations doesn't matter for her children caring
sakal

बोलून बातमी शोधा

high court

पत्नीवरील आधारहिन आरोपांमुळे मुलांचा ताबा तिच्यापासून रोखता येणार नाही : HC

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल केलेल्या आधारहिन आरोपांमुळे (Meaningless Allegations) तिच्या मुलांचा (children) ताबा तिच्यापासून रोखता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एका निकालात स्पष्ट केले आहे. फक्त लेखी आरोप (Written Allegations) केले म्हणून असे आरोप सिध्द होत नाही, असेही खंडपीठाने सुनावले आहे. ( Wife Meaningless Allegations doesn't matter for her children caring )

पाच आणि दोन वर्षाच्या मुलांचा ताबा मिळविण्यासाठी आईने नागपूर उच्च न्यायालयात याचिका केली होती. स्थानिक न्यायालयाने पतीची बाजू मान्य करुन दोन्ही मुलांचा ताबा आईला देण्यासाठी नकार दिला होता. पतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र केले होते कि पत्नीचे अनैतिक संबंध आहेत आणि त्यामुळे मुलांना ती योग्य प्रकारे सांभाळणार नाही. याबाबत मोबाईलमधील मेसेज आणि फोटो त्याने दाखल केले होते. हे प्रतिज्ञापत्र कनिष्ठ न्यायालयाने मान्य केले होते. याविरोधात पत्नीने केलेल्या याचिकेवर न्या व्ही व्ही कनकवाडी यांच्या पुढे सुनावणी झाली.

हेही वाचा: चांगली बातमी : दोन दिवसात तब्बल दहा हजार धारावीकरांना मिळणार मोफत लस!

मुलगा दोन वर्षाचा असल्यामुळे त्याचा ताबा कायद्याने आईला मिळतो तर मुलगी सहा वर्षाची आहे आणि मुलगी असल्यामुळे तिने आईकडे राहणे हितावह आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. केवळ मोबाईल मेसेजवरुन अनैतिक संबंध सिद्ध होत नाही. त्यासाठी साक्षी पुरावे आणि उलटतपासणी व्हायला हवी, मात्र कनिष्ठ न्यायालयाने या प्रक्रियेची दखल घेतली नाही असे खडे बोल खंडपीठाने सुनावले आहेत. आरोप लेखी स्वरूपात करुन उपयोगी नसतात तर त्यावर सक्षम पुरावे हवे. या प्रकरणात पत्नीला बाजू मांडण्यात आणि उलटतपासणी घेण्यासाठी संधी दिली नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. संबंधित प्रकरण पुन्हा स्थानिक न्यायालयात नव्याने सुनावणी घेण्यासाठी न्यायालयाने वर्ग केले आहे आणि तोपर्यंत मुलांचा ताबा आईला देण्याचे आदेश दिले.

loading image