पनवेलमध्ये वन्य प्राण्याचा माणसांवर हल्ला; कोल्ह्याने जखमी केल्याचा दावा | Panvel news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fox
पनवेलमध्ये वन्य प्राण्याचा माणसांवर हल्ला; कोल्ह्याने जखमी केल्याचा दावा

पनवेलमध्ये वन्य प्राण्याचा माणसांवर हल्ला; कोल्ह्याने जखमी केल्याचा दावा

मुंबई : शहारांमध्ये भटक्या कुत्र्यांनी माणसांना चावा घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र पनवेलमध्ये (panvel) वन्य प्राण्यांचा (wild animal attack) मुक्त संचार वाढला असून कोल्ह्यांनी माणसांना जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमी झालेल्यांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पनवेल तालुक्यातील माणघर, मोसारा, कुंडेवहाळ, भंगारपाडा येथील नागरिक कोल्ह्याच्या हल्ल्यामुळं भयभीत झाले आहेत. कोल्ह्यानेच हल्ला केला असल्याचा दावा (claim to be fox attack) जखमींनी केला आहे. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (Wild animal bites five people from panvel area claim to be a fox)

हेही वाचा: ओमिक्रॉन सामान्य सर्दी-खोकला नाही; केंद्र सरकारचा सतर्कतेचा इशारा

उर्मीला पाटील, सुमन घडगी, पार्वती भोईर, वैशाली नाईक आणि ओमप्रकाश कौर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना पनवेलच्या उप जिल्हा रुग्णालयात उपाचारासठी दाखल करण्यात आलं आहे. "माझी पत्नी घराबाहेर गेली होती. तिच्यासोबत माझी लहान मुलगी होती. कोल्ह्याने माझ्या पत्नीवर हल्ला केल्याने तिच्या पायाला दुखापत झालीय. कोल्ह्याने माझ्या मुलीवरही हल्ला केला पण माझ्या पत्नीने प्रसंगावधान राखून त्याच्या हल्ल्यापासून मुलीला वाचवलं. पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारिल नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कोल्ह्यावर दगडफेक केली त्यानंतर कोल्हा पळून गेला." अशी माहिती मानघर येथील नागरिकाने दिली आहे.

"रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केला आहे. कोल्ह्याने चावा घेतल्याचा अंदाज आहे. रेबिजपासून प्रतिबंध करण्यासाठी रुग्णांना अॅंटी सीरम देण्यात आलं आहे." अशी माहिती पनवेल उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे.

" कोल्हे सहसा माणसांवर हल्ला करत नाहीत. ते पिसाळल्यावर हल्ला करु शकतात. उरणच्या जंगल परिसरात अशा घटना क्वचितच घडतात. गेल्या कही काळात उरणच्या जंगलात कोल्ह्यांचा वावर पाहिला नाहिये. गावकऱ्यांवर जंगली कुत्र्याने हल्ला केला असावा. कोल्ह्याने चावा घेतल्याचा गावकऱ्यांचा गैरसमज झाला असेल. कोल्हे खासकरुन ससा, कोंबडी अशा पाळीव प्राण्यांची शिकार करतात. त्यांनी बकऱ्यांवर आणि माणसांवर हल्ला केलेला नाही. गावकऱ्यांवर केलेल्या हल्ल्याची खातरजमा करण्यासाठी कोल्ह्यांचा परिसरात मुक्त संचार आहे का, यासाठी फॉरेस्ट टीमकडून शोधमोहीम सुरु केली आहे." असं उरणचे फॉरेस्ट अधिकारी शशांक कदम यांनी सांगितलं आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Wild Animalspanvel
loading image
go to top