esakal | अर्णब गोस्वामी यांना पोलिस कोठडी मिळणार? उद्या होणार फैसला
sakal

बोलून बातमी शोधा

अर्णब गोस्वामी यांना पोलिस कोठडी मिळणार? उद्या होणार फैसला

अलिबाग सत्र न्यायालयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी मिळणार का?, याचा निर्णय गुरूवारी होणार आहे.  

अर्णब गोस्वामी यांना पोलिस कोठडी मिळणार? उद्या होणार फैसला

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः रिपब्लिक इंडिया या वृत्तवाहीनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळताना अनेक निरिक्षणे नोंदविली आहेत. त्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी मिळणार का?, याचा निर्णय गुरूवारी होणार आहे.  अर्णब गोस्वामी यांना ४ नोव्हेंबर रोजी रायगड पोलिस आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती. 

पोलिस कोठडी संदर्भात राज्य सरकारनं अलिबाग सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यानंतर न्यायाधीश मलिशेट्टी यांनी गुरुवारी निकाल जाहीर करु असं सांगितलं आहे. गोस्वामी यांच्यासह अन्य दोन आरोपींच्या पोलिस कोठडीबाबतही न्यायालय उद्याच निर्णय देईल. त्यानंतर या तिन्ही आरोपींच्या जामीनावरही सुनावणी होईल. 

अधिक वाचा-  कोरोनामुक्तीनंतर अन्य आजारांचा धोका! रक्त, ऑक्‍सिजन तपासण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

अर्णब गोस्वामी यांच्यावर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे

  1. अर्णब गोस्वामीला 4 नोव्हेंबरला मुंबईतील रहात्या घरातून अर्णब गोस्वामी यास ताब्यात घेत असताना शासकीय कामात अढथळा निर्माण करणे, महिला पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करणे यासाठी अर्णब आणि त्याची पत्नी संभ्रात गोस्वामी, मुलगा आणि दोन इतरांविरुद्ध मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये   सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी झालेला हल्ला, शांततेचा भंग करण्याचा हेतुपुरस्सर अपमान  आणि 606 अंतर्गत एफआयआर दाखल आहे.
  2. लॉकडाउन कालावधीत रिपब्लिक वाहिनीवरील 'पुछता है भारत' या कार्यक्रमात तसेच चर्चासत्रामध्ये दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्यामुळे गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. गोस्वामी यांना अटक टाळण्यासाठी प्रक्षोभक वक्तव्य करणार नसल्याचे लेखी बंधपत्र द्यावे लागणार असून, जामीन म्हणून दहा लाख रुपये भरावे लागणार आहेत. 
  3. मुंबई पोलिस दलात असंतोष असून, पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आदेश कुणीही पाळत नाही, असे वृत्त प्रसारित केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अँकरसह सहा जणांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांचे जबाब नोंदविण्यात आले.
  4. दोन समुदायात तेढ निर्माण केल्याप्रकणी गुन्हा रिपब्लिक इंडिया या वृत्त वाहिनीवर 22 एप्रिल रोजी पालघर येथे झालेल्या दोन साधूंच्या हत्येच्या बातमीच्या अनुषंगाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात बोलताना अर्णब गोस्वामी यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केली. यासंदर्भात त्यांच्या विरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.
  5. वांद्रे स्थानकावर जमलेल्या गर्दीचा संबंध मस्जिदशी जोडण्यात आला. ही घटना 14 एप्रिल रोजी घडली होती. यातही दोन समाजात तेड निर्माण केल्याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
  6. टीआरपी वाढविण्याचा घोटाळ्यात इतर वाहिन्यांबरोबर रिपब्लिक इंडियांच्या वाहिनीचे नावही समोर आले आहे. आरोपींनी रिपब्लिककडून पैसे घेतल्याचे कबूल केले असल्याचे गुन्हे शाखेने न्यायालयात सांगितले. रिपब्लिक वाहिनीतील अनेकांचे जबाब या प्रकरणात नोंदवण्यात आले.

Will Arnab Goswami get police custody  The decision will be made tomorrow