मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीची वाट आज होणार मोकळी ?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

महाराष्ट्रात आता कोरोनाच्या हालचालींसारख्याच राजकीय घडामोडी देखील वेगवान होताना पाहायला मिळतायत.

मुंबई - महाराष्ट्रात आता कोरोनाच्या हालचालींसारख्याच राजकीय घडामोडी देखील वेगवान होताना पाहायला मिळतायत. याला कारण ठरतंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकी. कालच महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती शिफारस करण्यात आलीये.  

कोरोनावरील अंतिम पर्याय 'हर्ड इम्युनीटी'चा ? पण, 'हर्ड इम्युनिटी' म्हणजे काय रे भाऊ?

अशात आता महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आलाय. याला कारण आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज दुपारी घेतलेली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट. या भेटीचं कारण जरी 'पत्रकारांवर होणारे हल्ले ही अघोषित आणीबाणी असल्याने राज्यपालांनी सरकारला निर्देश द्यावेत,ही मागणी असली तरीही मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून बोलली जातेय.

तिसरा Lockdown ?  गृहमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत...

राज्यात सध्या कोरोनाचं वादळ घोंगावतंय. अशात महाराष्ट्रासाठी राजकीय अस्थिरता परवडणारी नसल्याचं महाविकास आघाडीचे नेते म्हणतायत. यासाठी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीसाठी अनुकूल निर्णय घेण्यासाठी राज्यपालांना आग्रह धरणार आहेत. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे राज्यपालांना भेटणार आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या शिष्ट मंडळाच्या भेटीनंतर तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीची वाट मोकळी होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. 

will CM uddhav thackerays government appointed MLA rout cleared today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will CM uddhav thackerays government appointed MLA rout cleared today