राज्यातील सगळ्या धरणांचे ऑडिट करणार : रवींद्र वायकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

मुंबई : तिवरे धरण फुटल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.मंत्री गिरीश महाजनांसोबत मी धरणाच्या पाहणीला निघालो आहे.मात्र या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच धरणांचं ऑडिट करणार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपलं बोलणं झालं असल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली.

घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि NDRFA ची टीम दाखल झाली आहे.या टीमच्या मदतीने मदतकार्य आणि शोधमोहीम सुरू केली आहे.ज्या गावांचा संपर्क तुटला आहे त्यांना मदत करण्याचे काम सुरू आहे.वाशिष्ट नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी  किनारी असलेल्या गावांना देखील धोक्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती वायकर यांनी दिली.

या धरणासंबंधी प्रशासनाकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्याची ही माहिती घेऊ.हे धरण कोणी बांधले, नागरिकांनी तक्रारी करूनही दुर्लक्ष का गेले याची ही निश्चितपणे चौकशी करू.या प्रकरणात ज्याने हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई करू असा इशारा ही वायकर यांनी दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will conduct audit of all dams in future says Minister Ravindra waikar