

Mumbai Mayor Race Intensifies as Shinde Camp, Uddhav Sena, and BJP Lock Horns
esakal
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर कोण होणार, या प्रश्नाने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. २२७ जागांच्या सभागृहात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती बहुमतात असली, तरी पद वाटपावरून गूढ निर्माण झाले आहे. भाजपला ८९ जागा मिळाल्या, शिंदे गटाच्या सेनेला २९, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (यूबीटी)ला ६५ जागांसह दुसरा क्रमांक मिळाला. सर्वाधिक जागा असणाऱ्या पक्षाला महापौरपद मिळणे बंधनकारक नसले, तरी शिंदे हे पद हस्तगत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची कुजबुज सुरू आहे.