तिसऱ्या समन्सनंतर कंगना राणावत आज चौकशीसाठी हजर राहणार?

पूजा विचारे
Monday, 23 November 2020

समन्सनुसार कंगनाला आणि रंगोली हिला या महिन्यात  23 आणि 24 रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज कंगना चौकशीसाठी उपस्थित राहणार की नाही पाहावं लागेल. 

मुंबईः  गेल्या आठवड्यात अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंदेल हिला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स जारी केलेत. या समन्सनुसार कंगनाला आणि रंगोली हिला या महिन्यात  23 आणि 24 रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज कंगना चौकशीसाठी उपस्थित राहणार की नाही पाहावं लागेल. 

कंगना राणावत आणि मुंबई पोलिस यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.  वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे. त्यामुळेच आज आणि उद्या कंगनाला चौकशीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे.

अधिक वाचा-  वाढीव वीजबिल विरोधात आज भिवंडीत भाजपचे वीज बिल होळी आंदोलन

वांद्रे  न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी कंगनाला २६ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, दोघींनीही चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर, १० नोव्हेंबर रोजी कंगनाला आणि रंगोली हिला ११ नोव्हेंबर रोजी हजर राहावे, अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंगनानं भावाच्या लग्नाचं कारण पुढे करत चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघींनाही तिसऱ्यांदा समन्स पाठवले.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लिम समुदायमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कंगना करत असल्याचे याचिकेत म्हटले होते. कास्टींग डायरेक्टर मुनावर अली उर्फ साहिल सय्यद यांनी ही याचिका दाखल केली होती. समाजमाध्यमांत तसेच टीव्हीवर सगळीकडे बॉलिवूडच्या विरोधात बोलत आहे. ती सतत बॉलिवूड विरोधात माहिती पसरवली जात आहे. कंगनाविरोधात विरोधात दोघांनी वांद्रे न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Will Kangana Ranaut be present for interrogation today after the third summons


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Kangana Ranaut be present for interrogation today after the third summons