वाढीव वीजबिल विरोधात आज भिवंडीत भाजपचे वीज बिल होळी आंदोलन

वाढीव वीजबिल विरोधात आज भिवंडीत भाजपचे वीज बिल होळी आंदोलन

मुंबईः  लॉकडाऊनच्या काळात अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिल रक्कम मोजावी लागली. त्यात कोरोना प्रादुर्भाव आजारामुळे सर्व नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे, असे असताना वीजबिलात सूट देण्याची घोषणा सरकराने केली.  मात्र त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफीच्या घोषणे वरून घुमजाव करीत सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीजबिल पाठवून ती भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. 

सरकारची ही भूमिका ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज वीज बिलांची होळी करून महाविकास आघाडी सरकारच्या दुटपी भूमिकेचा निषेध नोंदवला जाणार असल्याची माहिती भाजपा भिवंडी शहरध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली.

भिवंडी शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जात असताना लाखो मजूर आपली घरे बंद करून आपल्या मूळगावी गेली होती. त्यांच्या बंद असलेल्या घरात
वीज पुरवठाचे हजारो रुपये वीजबिल आले आहेत. तसेच बंद यंत्रमाग कारखानदार, दुकानदार यांना सुध्दा लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात वीजबिल आली आहेत. तर अनेक ठिकाणी मीटर तपासणी न करता ग्राहकांना मनस्ताप देणारे एवरेज बील पाठविण्यात आलीत. विजबिलात आकारणी केलेली रक्कम फार मोठ्या प्रमाणात आहे ती किमान कमी केली तरी नागरिकांना दिलासा मिळू शकतो अशी भावना ग्राहक  वर्ग व्यक्त करीत आहेत.

याबाबत वीज कंपनी आणि सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.  मात्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने वीज ग्राहकांना वीजबिल माफी देण्यात यावी या मागणीसाठी आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी  भाजप आज सकाळी 11 वा. भिवंडी शहरातील तहसीलदार कार्यालय आणि स्व. आनंद दिघे चौकात वीजबिलांची होळी करत आंदोलन करणार आहे.

या आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेवक भाजपाचे शहरध्यक्ष संतोष शेट्टी, सरचिटणीस रवी सावंत, प्रितेश ठक्कर, महिला शहराध्यक्ष ममता परमाणी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BJP electricity bill Holi agitation in Bhiwandi today against increased electricity bill

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com