पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? जयंत पाटील यांची थेट प्रतिक्रिया

सुमित बागुल
Thursday, 14 January 2021

"पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे? त्याबाबत काय सांगाल"

मुंबई : धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलेले पाहायला मिळतंय. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना धनंजय मुंडे यांच्याबाबत विचारणा करण्यात आली होती. दरम्यान या विषयावर पक्ष पातळीवर याविषयावर चर्चा होणार असल्याचं स्वतः शरद पवार यांनीही सांगितलंय. जयंत पाटील यांनी मात्र पत्रकार परिषदेत या विषयावर बोलणार नसल्याचं म्हटलंय.

सर्वात महत्त्वाची बातमी : "आरोप गंभीर, पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल" पवारांची पहिली प्रतिक्रिया; मुंडे राजीनामा देणार?

एकीकडे धनंजय मुंडे यांचं प्रकरण तापलं असताना पंकजा मुंडे यांच्या बाबत देखील चर्चा सुरु झाली आहे. पंकजा मुंडे या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, अशा देखील चर्चा जोर धरतायत. त्याबाबत देखील जयंत पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली. "पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे? त्याबाबत काय सांगाल" असं विचारलं. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

जयंत पाटील यांचं थेट उत्तर....

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर भाष्य करण्यास जयंत पाटील यांनी नकार दिला. पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना पंकजा मुंडे यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारणा करण्यात आली. यावर मात्र जयंत पाटील यांनी थेट उत्तर दिले आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणालेत की, "माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आलेली नाही" असं उत्तर जयंत पाटील यांनी दिलं आहे.

will pankaja munde join NCP reaction of NCP maharashtra chief jayant patil 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will pankaja munde join NCP reaction of NCP maharashtra chief jayant patil